आत्ताचे पालकत्व करणारे जनता त्यांच्याकडे जाताच कपाळावर आठ्या पाडतात : अमित कदम


आत्ताचे पालकत्व करणारे जनता

त्यांच्याकडे जाताच कपाळावर

आठ्या पाडतात : अमित कदम 

सातारा : राष्ट्रवादी (शरद पवार), कॉंग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि इतर पक्ष हे सगळे एकत्र येताहेत ते काय राजकीय फायद्यासाठी नाही तर महायुतीच्या हातात सत्ता गेली, तर जात जातीत, पक्ष पक्षात, भाऊ भावात राहणार नाही आणि येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. माझे वडील जीजी आण्णा, सदाभाऊ, शशिकांत शिंदे यांनी जावलीच पालकत्व केले. कोणत्याही कामासाठी गेले तरी ते जनतेला भेटत होते, परंतु आत्ताचे पालकत्व करणारे जनता त्यांच्याकडे जाताच कपाळावर आठ्या पाडतात अन मतांची आकडेवारी पुढ्यात ठेवली जाते. अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी केली.

मेढा येथे महाविकास आघाडी निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, राष्ट्रवादी ( शरद पवार गट) कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश पार्टे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष संदिप माने, शिवसेना ( उबाठा गट ) चे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, ज्येष्ठ नेते नारायण शिंगटे, साधू चिकणे, प्रकाश कदम, सचिन जवळ, विठ्ठलराव देशमुख आदी उपस्थित होते.

मी राजकीय सत्तेचा किती लाभ घेतला आहे. आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी पक्ष बदलतो, पण तुम्ही कशासाठी पक्ष बदलले, ठेकेदारांना जगवण्यासाठी ना? राजकीय सत्तेत आम्ही तुम्हाला कसेही नाचवू शकतो, अशांच्या विरोधात आमची बंडखोरी कायम राहील. ठेकेदारांचे लाभार्थी, एखादे मिळालेले काम अथवा अडचणीत आणलेला माणूस अशा प्रकारची माणसे यांचे कार्यकर्ते आहेत. यात सामान्य माणूस म्हणून कार्यकर्ता नाही.  

महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची संस्कृती बिघडविल्याचा आरोप करून जाती धर्मातील माणसाला माणसात राहुन द्यायचा नाही, असा विकृत मनोवृत्तीचा माणूस राज्याच राजकारण करतो आहे, अशा शब्दात सातारा -जावलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी टीका केली.

 माजी आमदार सदाशिव सपकाळ म्हणाले, लोकप्रतिनिधी २० टक्के, ठेकेदार २० टक्के आणि अधिकारी २० टक्के कमीशन खातात तर ४० टक्क्यात काम होणार कस? अशी टीका करीत दोन दोन महिन्यात रस्ते खराब होतात अन पूल वाहून जातात म्हणजे विकास कसला? असा प्रश्न उपस्थित करत ठेकेदारांना पोसल जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

यावेळी सुरेश पार्टे, संदीप माने व संतोष चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक व स्वागत साधू चिकने यांनी केले.

Post a Comment

0 Comments