मकरंद आबांच्यावर कणभर
उपकार केले, तर आबा मणभर
मदत करतात : धैर्यशिल कदम
सातारा : आमदार मकरंद पाटील यांना मी कित्तेक वर्षापासून ओळखतो.मकरंद आबांच्या सारखा जातीय सलोखा राखणारा,सर्वांसाठी झटणारा,जनतेच्या कायम संपर्कात राहणारा आणि दानशूर नेता वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघाला लाभला आहे हे या मतदार संघाचे भाग्य आहे.मकरंद आबांच्या वर कणभर उपकार केले तर ते त्याची परतफेड मणभर मदत करून करतात याचा अनुभव माझ्या सहित संपूर्ण जिल्ह्याने घेतला आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले.
महाबळेश्वर गुताड याठिकाणी भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात धैर्यशील कदम बोलत होते.याप्रसंगी वाई खंडाळा महाबळेश्वर चे आमदार मकरंद पाटील,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,सरचिटणीस बलशेठवार,वाई विधानसभा संयोजक अजय मांढरे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपूरे,महाबळेश्वर तालुका प्रभारी शेखर भिलारे,भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष उषा ओंबळे,भाजपा च्या महाबळेश्वर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली भिलारे,सह भाजपाचे तालुका सह प्रभारी तानाजी भिलारे,महाबळेश्वर शहर भाजपा उपाध्यक्ष मोहन गोळे भाजपा भाजपचे महाबळेश्वर शहर अध्यक्ष प्रशांत भोईटे,उपाध्यक्ष विजय बिरामने,महेंद्र परदेशी,युवा अध्यक्ष रवींद्र शिंदे,शहर प्रभारी राजेंद्र पवार,सह प्रभारी अनिल परदेशी,कार्यकारिणी सदस्य संतोष कवी,मंगेश उपाध्याय,रवी कुंभार,शिवसेना नेते प्रवीण भिलारे,उवा अध्यक्ष अनिल लाघी
भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, की महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीच सरकार येणार आहे.आपण महायुतीचा धर्म पाळून मकरंद आबा यांना पूर्ण ताकत देऊन,प्रचंड मतदान करून,विजयी करायचं आहे.सरकारने वीज बील माफ करण्याचे काम राज्य सरकारने केलं आहे.हे सरकार सर्वांसाठी आहे.
मी आदरणीय लक्ष्मण पाटील यांचा कार्यकर्ता आहे.त्यांनीच मला घडवलं आहे. आबांच्यावर कणभर उपकार कराल तर आबा मणभर मदत करतात हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे.मकरंद आबांच्या सारखा प्रत्तेकासाठी झटणारा,जातीय सलोखा राखणारा,दानशूर नेता भेटला आहे हे या मतदार संघाचे नशीब आहे.म्हणूनच भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून प्रत्येकाला आवाहन करतो मकरंद आबांना प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे.
मकरंद पाटील म्हणाले, की भारतीय जनता पार्टी ही शिस्त बध्द पार्टी आहे.प्रत्त्येक कार्यकर्ता दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडतो.देशाचे पंतप्रधान,गृह मंत्री अमित शहा हे दोघे ही या देशाची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.महायुती च सरकार अतिशय सक्षम पने काम करतय.अजित दादा प्रचंड काम करणारा,देवेंद्रजी शब्दाला जगणारा,संघटन कौशल्य असणारा,प्रशासनावर पकड असणारा नेता ,एकनाथजी शिंदे सर्व प्रश्नांची जान असणारे नेतृत्व असा हा त्रिवेणी दुग्धशर्करा योग असलेले तिन्ही पार्टीचे नेते आहेत.
सरकारचा निर्णय घराच्या चुलीपर्यंत येतो यासारखं सरकार नाही.आपल्या मतदार संघातील १७५००० भगिनी पैकी १०७००० भगिनींच्या नावावर लाडकी बहिण योजनेचे पैसे आले आहेत.
सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली आहे.साडेसात एच पी पर्यंत बिल शेतकऱ्यांना येणारच नाही.वर्षाला ४४००० रुपये लोकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे सरकारच ध्येय आहे.मी कधीही कुणालाही दुखावलं नाही.मी पक्ष,जात,गट कधीही पाहिले नाहीत.जो जो माझ्याकडे आला त्याचे प्रत्येक काम केलं.कारण मी या संपूर्ण मतदार संघाचा आमदार आहे.त्यांचं पालकत्व मी स्वीकारलं आहे.तुमची कुठलीही कामे असू द्या,कुठलाही संकोच न करता माझ्याकडे या l.त्या प्रत्त्येक कामाला न्याय देऊन प्रत्त्येक काम १०० टक्के करणारच.
भारतीय जनता पार्टीने प्रामाणिकपने माझ्या प्रचाराची सुरुवात केलीय.आपण महायुतीचे घटक आहोत.आपण सर्वजण एक आहोत.महाराष्ट्रात १०० टक्के महायुती ची सत्ता येणार आहे असा विश्वास ही या प्रसंगी आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपूरे म्हणाले की मकरंद आबा यांचं कार्य खूप मोठ आहे.धर्म,जात गट या गोष्टी आबांनी कधीच मानल्या नाहीत.शहर आणि ग्रामीण भागातील भाजपाची सगळी मते मकरंद पाटील यांनाच पडणार याची आम्हाला खात्री आहे.
भारतीय जनता पक्षाचे तालुका संयोजक अजय मांढरे म्हणाले की मकरंद पाटील विजयाचा चौकार नक्की मारतील.आबांच्याकडे जस राष्ट्रवादीच पालकत्व आहे तसेच आता महायुती चे सुध्दा पालकत्व आले आहे.या प्रसंगी महाबळेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!