अमित कदम यांनी घेतले साहेबराव पवार यांचे आशीर्वाद

 


अमित कदम यांनी घेतले

साहेबराव पवार यांचे आशीर्वाद 

सातारा : सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. सातारा शहरांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रभागनिहाय भेटी वाढू लागले आहेत. त्यातच कोपरा सभांचे मोठे आयोजन केले जात आहे.

महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमित कदम यांनी सातारा शहरात पदयात्रा काढली. या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान त्यांनी शहरातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन मशाल चिन्ह दाबून निवडून देण्याचे आवाहन केले. अमित कदम यांच्या आवाहनला मतदार उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. 

पदयात्रादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. साहेबराव पवार हे माजी आमदार स्वर्गीय जी. जी. कदम यांचे विश्वासू सहकारी आहेत. यावेळी साहेबराव पवार यांचे पुत्र राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार कुटुंबीय उपस्थित होते. 



Post a Comment

0 Comments