किसन वीर व खंडाळा
कारखान्याचा गळीत हंगामाचा
बुधवारी शुभारंभ
सातारा : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार (दि. १३) रोजी होणार आहे. खंडाळा कारखान्याचा सकाळी १० वाजता, तर किसन वीर कारखान्याचा दुपारी १ वाजता कार्यक्षेत्रातील पाच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शासनाने राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्याबाबत सुचित केलेले होते. किसन वीर व खंडाळा कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे पूर्ण झालेली असून, कारखाना गळितासाठी सज्ज झालेला आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यावर ऊस तोडणी मजूरही दाखल झालेले आहेत. मागील दोन हंगाम आपण यशस्वीरित्या चालवून शेतकरी व वाहन मालकांचे संपूर्ण पेमेंट अदा केल्यामुळे तसेच मागील संचालक मंडळाच्या काळातील सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बिल ५४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यामुळे कारखान्यावर विश्वास वाढलेला आहे. किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्याचे आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ संचालक मंडळाने डोळ्यासमोर ठेवलेले आहे. हा गळीत हंगाम शेतकरी व कामगारांच्या सांघिक प्रयत्नातून यशस्वी करणार आहोत. या गळीत हंगामातही एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम आपण देणार असून सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी कोणत्याची भुलथापांना बळी न पडता आपला संपूर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच गाळपासाठी देण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केलेले आहे.
किसन वीर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!