शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारार्थ
सातारा शहरात आजपासून
पदयात्रा
प्रचार कार्यालयाचा सकाळी १० वाजता शुभारंभ; ठिकठिकाणी कोपरा सभांचेही आयोजन
सातारा : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आजपासून (मंगळवार दि. ५) ते दि. १५ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी ७ वाजता सातारा शहरात विविध मार्गावर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी शहरातील विविध भागात कोपरा सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आज मंगळवारी सकाळी १० वाजता शाहू चौक येथील जुने दिग्विजय शोरूम येथे शिवेंद्रसिंहराजेंच्या शहर प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
मंगळवार दि. ५ रोजी सकाळी ७ वाजता गारेचा गणपती येथून गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. गारेचा गणपती, कारंडबी नाका, मोरे कॉलनी, कृष्णेश्वर पार्क, गोखले हौद, न्हावी आळी, मंगळवार तळे, विठोबाचा नळ, जलमंदिर ते सुरुची अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता साईबाबा मंदिराशेजारी तामजाईनगर आणि रात्री ८ वाजता शाहूपुरी चौक येथे कोपरा सभा होणार आहे.
बुधवार दि. ६ रोजी सकाळी ७ वाजता अदालतवाडा, वाघाची नळी, पटवर्धन बोळ, कमानी हौद, कूपर कारखाना ते नगरपालिका शाहू चौक अशी पदयात्रा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता ढोरगल्ली तर, रात्री ८ वाजता एस. टी. कॉलनी मैदान शाहूनगर येथे कोपरा सभा होणार आहे.
गुरुवार दि. ७ रोजी सकाळी ७ वाजता एमजीपी कार्यालय, एसटी कॉलनी, फिनिक्स बंगला, अजिंक्य बाजार चौक, जगताप हॉस्पिटल, काळोखे वस्ती, मशीद, मारुती मंदिर, रणजित साळुंखे घर, माळी आळी, छ. अभयसिंहराजे भोसले कमान, हायवेने मस्केवाडा, जिजामाता उद्यान, बागड वस्ती, गोडोली चौक, जुनी शाळा, भैरवनाथ मंदिर, खामकर चौक, साई पतसंस्था, गोडोली जकात नाका अशी पदयात्रा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता लोणारगल्ली रविवार पेठ आणि रात्री ८ वाजता लक्ष्मी आई मंदिर गडकर आळी येथे कोपरा सभा होणार आहे.
शुक्रवार दि. ८ रोजी सकाळी ७ वाजता मोना स्कुल, करी आप्पा चौक, लक्ष्मी टेकडी, लतीफभाई चौधरी घर, पोलीस चौकी, बाजारपेठ, आमणे बंगला, भीमाबाई आंबेडकर चौक अशी पदयात्रा, सायंकाळी ५ वाजता मार्केट यार्ड आणि सायंकाळी ७ वाजता रवी ढोणे कॉलनी, चिमणपुरा येथे कोपरा सभा होणार आहे.
शनिवार दि. ९ रोजी सकाळी ७ वाजता छ. शाहू चौक, कुंभारवाडा, पाटोळे चौक, शंभूराज देसाई बंगला, पोवई नाका, कासट मार्केट, शिकलगार वाडा, तहसील कचेरी, भाजीमंडई, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, वडार वस्ती, पंताचा गोट मैदान, प्रकाश लॉज, प्रिया व्हरायटीज ते शिक्षक बँक अशी पदयात्रा, सायंकाळी ६.३० वाजता भैरवनाथ कॉलनी पिलेश्वरी नगर आणि रात्री ८ वाजता एलबीएस कॉलेज चौक येथे कोपरा सभा होणार आहे.
रविवार दि. १० रोजी सकाळी ७ वाजता सुरुची बंगला, कोटेश्वर चौक, जाधव आवाड, ऐक्य प्रेस, बुधवार नाका, लकडी पूल ते ५०१ पाटी अशी पदयात्रा, सायंकाळी ६.३० वाजता भारतमाता चौक, सदरबझार आणि रात्री ८ वाजता रामभाऊ नलवडे, अप्पा महाडिक घर येथे कोपरा सभा होणार आहे.
सोमवार दि. ११ रोजी सकाळी १० वाजता सेनॉर चौक, आंदेकर चौक, बाबर कॉलनी, डॅनी पवार, झेंडा चौक, बाळासो भुजबळ घर, भैरवनाथ मंदिर, पटांगण ते जगन्नाथ किर्दत घर अशी पदयात्रा, सायंकाळी ६.३० वाजता गुरुवार परज येथे कोपरा सभा आणि रात्री ८ वाजता धीरज ढाणे मंगळवार तळे येथे मेळावा होणार आहे.
मंगळवार दि. १२ रोजी सकाळी ७ वाजता समर्थ मंदिर, बोगदा, पापाभाई पत्रेवाले, रविंद्र ढोणे घर, खारी विहीर, महेश महाडिक घर, राजू भोसले घर, डफळे हौद, विश्वेश्वर चौक, गुजर आळी, कात्रेवाडा, हेडगेवार चौक, रमेश जाधव दुकान, चांदणी चौक ते राजवाडा अशी पदयात्रा, सायंकाळी ६. ३० वाजता महादेव मंदिर जवळ दौलतनगर आणि रात्री ८ वाजता विजय मंडळ शिर्के शाळा येथे कोपरा सभा होणार आहे.
बुधवार दि. १३ रोजी सकाळी ७ वाजता तालिमखाना, फुटका तलाव, औताडे घर, एकता चौक, गोलमारुती चौक, सुपनेकर घर, दत्त मंदिर, फुटका तलाव, मारवाडी चौक अशी पदयात्रा, सायंकाळी ७.३० वाजता सातारा शहर सार्व. गणेशोत्सव व मंडळ मेळावा आणि रात्री ९ वाजता काशी विश्वेश्वर चौक, मंगळवार पेठ येथे कोपरा सभा होणार आहे.
गुरुवार दि. १४ रोजी सकाळी ७ वाजता कुबेर विनायक मंदिर, अजिंक्य कॉलनी, विशाल मेगा मार्ट, रामकृष्ण कॉलनी, सेंटपॉल स्कुल, सिव्हिल हॉस्पिटल, देशमुख कॉलनी, रिमांड होम, जुने आरटीओ ऑफिस, गणेश कॉलनी, बनसोडे वस्ती या मार्गावर पदयात्रा, सायंकाळी ६.३० वाजता कल्याण पार्क विलासपूर आणि रात्री ८ वाजता गारेचा गणपती येथे कोपरा सभा होणार आहे.
शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी ७ वाजता खणआळी, सम्राट चौक, ५०१ पाटी, देवी चौक, वेलणकर बोळ, गुरुवार परज, शेटे चौक, कमानी हौद, एलबीएस कॉलेज बोळ, मल्हार पेठ ढोर गल्ली या मार्गावर पदयात्रा, सायंकाळी ६ वाजता फुटका तलाव, सायंकाळी ७.३० वाजता शाहूपुरी पोलीस स्टेशन आणि रात्री ८.३० वाजता भैरवनाथ मंदिर पटांगण करंजे नाका येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा व कोपरा सभा यांना दोन्ही आघाडीचे आजी- माजी पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!