लाडक्या भावाच्या पाठीशी उभे रहा : सौ. अर्चनाताई मकरंद पाटील


लाडक्या भावाच्या पाठीशी उभे

रहा : सौ.अर्चनाताई म. पाटील

सातारा : वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात आ. मकरंद पाटील यांनी केलेले कार्य आणि जनतेशी जपलेला जिव्हाळा महत्त्वाचा आहे. मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाशी त्यांनी थेट नाते जोडले आहे. प्रत्येकाच्या सुख दु:खात ते नेहमीच सहभागी असतात. महायुतीची लाडकी बहिण योजना कायम सुरु रहावी यासाठी आ. पाटील यांच्या पाठीशी लाडक्या बहिणींनी आणि भावांनीही भक्कमपणे उभे रहावे आणि महाराष्ट्रातील सर्वात लाडका भाउ आ. मकरंद पाटील आहे, हे या मतदानातून दाखवून द्यावे, असे आवाहन सौ. अर्चना मकरंद पाटील यांनी केले.

महायुतीचे उमेदवार आ. मकरंद पाटील यांच्या प्रचारासाठी सौ. अर्चना पाटील यांनी थेट मतदारांच्या भेटीगाठींवर संपर्क दिला आहे. प्रत्यक्ष मतदारांशी थेट संवाद साधून त्या आपली भूमिका मांडत आहेत. सौ. अर्चना पाटील पुढे म्हणाल्या, मकरंदआबांनी संपूर्ण मतदारसंघ हेच आपले कुटुंब माणले आहे. त्यांनी कधीच आपले कुटुंब आणि मतदार यांच्यामध्ये दुजाभाव केला नाही. कुटुंब माणून काम केल्यानेच मतदारांनी त्यांना प्रत्येक निवडणुकीत वाढते मताधिक्क्य दिले आहे आणि यंदाही तीच परंपरा मतदार कायम राखतील, याचा मला विश्वास आहे.

आपल्या मतदारसंघातील साखर कारखाने अडचणीत आले. मतदार संघातील जनतेला वाऱ्यावर सोडायचे नाही यासाठी पावणेतीनशे कोटी रुपयांचा तोटा आणि १ हजार कोटी रुपयांची देणी असलेले कारखाने ताब्यात घेउन सुस्थितीत आणण्याचे काम सुरु केले आहे. अजितदादांनी त्यांना सरकारच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदतही केली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेले मला चालणार नाही, अशी त्यांची भूमिका असते. शेतकरी आणि गोरगरीबांविषयीची त्यांची तळमळ सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळेच जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे.

सौ. अर्चना पाटील यांच्या दौऱ्याला माता, भगिनींचा आणि भावांचाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. दौऱ्यात त्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी त्या करत आहेत. सामान्यातील सामान्य जनतेशी नाळ जोडण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न बघून मतदारांनाही आनंद होत आहे. सामान्यांमध्ये मिसळण्याच्या त्यांच्या भूमिकेचे प्रचंड स्वागत होत आहे. त्यामुळे अर्चनाताईही लोकांना आपल्या कुटुंबाचा एक भाग वाटत आहेत. आम्ही आबांच्याच पाठीशी राहणार आणि त्यांनाच विक्रमी मतांनी विजयी करणार, वहिनी तुम्ही काहीही काळजी करु नका, अशा शब्दात माता आणि भगिनी अर्चनतााईंना विश्वास देत आहेत. त्यामुळे आबांचा यंदाच्या निवडणुकीत फार मोठा विजय होईल, असा विश्वासही अर्चनाताई व्यक्त करत आहेत.दौऱ्यात त्यांच्या बरोबर सौ उज्वलाताई मिलिंद पाटील, सौ मनीषा गाढवे,रेखा चिरगुटे, संगीता मसकर, चेतना जाधव, माधवी पवार, वृषाली चव्हाण, वैभवी गायकवाड, संगीता लोळे, सरिता सावंत, अरुणा पवार, मेघा सावंत व असंख्य महिला साथ देत आहेत.

Post a Comment

0 Comments