किसन वीर कारखान्याच्या कामगारांचा आमदार मकरंद पाटील यांना एकमुखी पाठिंबा

 

 

किसन वीरच्या कामगार

शेतकऱ्यांसाठी सर्वस्व पणाला

लावणार : आ. मकरंद पाटील

किसन वीरच्या कामगारांचा आ. मकरंद पाटील यांना एकमुखी पाठिंबा

सातारा : किसन वीर कारखान्याच्या सर्वच कामगारांनी आमदार मकरंद पाटील यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करून आमदार मकरंद पाटील यांना सर्वोच्च मतांनी निवडून द्यायचा निर्धार केला. दरम्यान, कामगारांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी आनंद व्यक्त करून सांगितले की माझी आमदारकी चांगली चालली होती, पण किसन वीरचे कामगार, शेतकऱ्यांनी केलेल्या विनंतीमुळे मी किसन वीर कारखाना ताब्यात घेतला आणि किसन वीरच्या कामगार शेतकऱ्यांसाठी माझी आमदारकी पणाला लावली. किसन वीर कारखाना यशस्वीरीत्या चालवला. शेतकऱ्यांची सर्व देणी देऊन टाकली. कामगारांची दिवाळी गोड केली. 

यावेळी किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, किसन वीर कारखान्याचे कामगार युनियन अध्यक्ष दत्तात्रय शेलार, उपाध्यक्ष विकास पाटील मोहन कदम, कार्याध्यक्ष अजित पिसाळ, सेक्रेटरी निलेश भोईटे, खजिनदार भरत भोसले, सर्व संचालक, युनियनचे पदाधिकारी, किसन वीरचे सर्व कामगार उपस्थित होते.

आमदार मकरंद पाटील म्हणाले, की विधानसभेची निवडणूक आणि कामगारांची बैठक ही माझ्या १५ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदा घडतंय. तात्यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी राजकारणात आलो. मागील १५ वर्षात एक विकसनशील मतदारसंघ म्हणून मी मतदारसंघाची बांधणी केली. माझ्याकडे आलेल्या १०० टक्के लोकांना मी कधीच नाराज होऊन पाठवलं नाही. लोकप्रतिनिधी म्हणून एक गाव अस नाही की ज्या गावामध्ये मागील पाच वर्षात मी किमान एक कोटी रुपयांची विकासकामे केली नाहीत. ४५०० कोटी रुपयांची कामे मागील चार वर्षात केली. दिवसरात्र काम करून हा मतदारसंघ विकासात्मकरित्या बांधण्याचा मी प्रयत्न केलाय. माझी आमदारकी इतकी चांगली चालली होती, पण तरीही तुमच्या आग्रहाखातर एक रुपया खिशात नसताना २ वर्ष कारखाना चालवला. मागील व्यवस्थापनाने १२,८०० शेतकऱ्यांचे तब्बल ५४ कोटी रुपये थकवले होते. ते पैसे तर बुडल्यात जमा होते. पण मी मात्र निर्धार केला होता. गरीब शेतकऱ्यांचे पैसे काहीही झालं तरी द्यायचेच. कारखाना वाचवायचा. म्हणूनच आत्ता ही आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. कारखण्यावरची जप्ती टळली. फक्त किसन वीर कारखान्याच्या कामगार आणि शेतकऱ्यांसाठी अजित पवार यांच्या आघाडीत सामील झालो. सत्तेमध्ये दादांच्या सोबत गेलो त्याचा फायदा आपल्याला झाला.फक्त आणि फक्त ऊस उत्पादक सभासद आणि कामगारांच्या आग्रहाखातर कारखान्याची निवडणूक लढवली. कारखाना ताब्यात घेतला, त्यावेळी कारखान्याची अवस्था तुम्हाला चांगलीच माहीत होती. कारखान्याची जप्ती होणार होती. १००० कोटींचे कर्ज होत. ३०० कोटी रुपयांचा तोटा होता. भारतातील कोणतीही बँक कारखान्याला कर्ज द्यायला तयार न्हवती. प्रचंड मोठं आव्हान होत आमच्या समोर! पण आलेल्या प्रत्त्येक संकटावर मात करीत मागील २ वर्ष कारखाना यशस्वीरीत्या चालवला. अजित पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वोतोपरी मदत करून ४६७ कोटी रुपये थकहमी दिले. पैसे मिळाल्यानंतर पाहिले काम काय केले, तर मागच्या व्यवस्थापनाने गरीब शेतकऱ्यांचे थकविलेले ५४ कोटी रुपये शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची या वर्षीची दिवाळी गोड केली. कामगारांना दोन पगार देऊन तुम्हा कामगारांची दिवाळी गोड केली. मी कधीच कामगारांना माझ्या प्रचारासाठी बाहेर घेऊन जायला सांगणार नाही. फक्त मी तुम्हाला आणि शेतकऱ्यांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणूनच तुम्ही दिलेल्या पाठिंब्याने मी समाधानी आहे. मी कायम तुमच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या निवडणुकीत घडल्याच्या चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

किसन वीर कारखान्याच्या कामगार युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार म्हणाले, की आबा हे खऱ्या अर्थाने जननायक आहेत. आबांनी कारखाना ताब्यात घेतला नसता, तर कारखान्यावर जप्ती आली असती. कारखान्याचा लिलाव झाला असता आणि कारखान्याचे खाजगीकरण झाल असत तर आपण काय केलं असत. आबांनी कारखान्यासाठी त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावली. म्हणूनच आबा जननायक आहेत. प्रत्त्येक गावातील कर्मचारी इथे आहेत. कोणत गाव अस नाही जिथे आबांनी काम केलं नाही. आबा जर आपल्यासाठी तेवढी धडपड करत असतील, तर आपण आबांसाठी काम केलच पाहिजे. आबा आपले दाता आहेत. त्यांच्यामुळेच आपले संसार चालले आहेत. त्यांच्यामुळेच आज आपल्याला रोजीरोटी मिळत आहे. मग जी व्यक्ती आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असते, अश्या आपल्या या देव माणसाला आपण पाठिंबा दिलाच पाहिजे. म्हणूनच आबा आम्हा सर्व कामगारांचा तुम्हाला एकमुखी पाठिंबा आहे आणि तुम्ही मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहात हे प्रत्येकाला माहीत आहे.

किसन वीर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले, की मकरंद आबांनी मागील ३ वर्षात ४००० कोटीची कामे केली आहेत. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून कामगार आणि शेतकऱ्यांनी आबांना साकडं घातलं. आबा तुम्ही निवडणूक लढवा. कारखाना ताब्यात घ्या. म्हणूनच कारखाना वाचविण्यासाठी आबांनी निवडणूक लढवली. आत्ता पदावर आबा, अजितदादा नसते तर कारखाना वाचला नसता. १००० कोटी कर्ज असणारा कारखाना चालविण्याचा आबांनी शिवधनुष्य घेतलं ते फक्त तुमच्यासाठी घेतलं. समाजातील प्रत्येक संकटग्रस्त व्यक्तीचे अश्रू पुसण्याचे खरे काम आबांनी केलंय. आम्ही कारखाना ताब्यात घ्यायच्या अगोदर निवडणूक लागली. प्रत्त्येक कामगार डबे घेऊन वणवण फिरायचा. कारण तुमच्या समोर पर्याय न्हवता. ज्या आबांनी कारखाना वाचवला, मतदारसंघाचा चौफेर विकास केलंय. त्या आबांना मत देणं हे आपलं कर्तव्य आहे.आबांच्या विजयामध्ये कारखान्याचा सहभाग असावा.

माझ्यासहित कोणताही संचालक कारखान्याचा एक रुपयाचाही लाभ घेत नाही

आम्ही किसनवीर कारखाना ताब्यात घेतल्यापासून कारखान्याचा कारभार अतिशय काटकसरीने करतोय. आमच्या संचालकांच्या कुणाच्याही गाडीमध्ये कारखान्याच्या पैशातील एक रुपयाचं डिझेल आत्तापर्यंत टाकलं नाही. माझ्यासहित कोणताही संचालक कारखान्याची गाडी वापरत नाही. मीटिंगचा सुद्धा आम्ही एक रुपयाचा हप्ता ही आम्ही घेत नाही. इथल्या गेस्ट हाऊसवर कोणीही जेवत नाही, असे मकरंद आबांनी किसन वीरच्या कामगारांना सांगितले.

Post a Comment

0 Comments