पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंबाची मतदारसंघात भिंगरी

 


पुरुषोत्तम जाधव यांच्या

प्रचारासाठी संपूर्ण कुटुंबाची

मतदारसंघात भिंगरी

घराणेशाही संपवण्यासाठी स्वाभिमानी खंडाळा तालुक्याने साथ द्यावी

पुरुषोत्तम जाधव यांचे मतदारांना आवाहन

सातारा : अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले असून, पुरुषोत्तम जाधव यांच्या पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे यांनी आज खंडाळा तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन पुरुषोत्तम जाधव यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले, वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील घराणेशाही व मस्तवाल सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी आता खंडाळा तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने माझ्यासारख्या सामान्य शेतकरी, वारकरी कुटुंबातील उमेदवाराला साथ द्यावी. खंडाळा तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने पाठीशी राहा अशा वाहन वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी भादे ता. खंडाळा येथील प्रचार सभेदरम्यान व्यक्त केले. 

अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी पिसाळवाडी, धनगरवाडी, माने कॉलनी, भोळी, शेखमीरवाडी, लोणी ,तोंडल, भादे ,वाठार ,शेडगेवाडी, अंदोरी, भाऊकलवाडी ,मरीआचीवाडी, पिंपरी, पाडेगाव, लोणंद येथे जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन तेथील प्रश्न जाणून घेतले.

Post a Comment

0 Comments