मतदारसंघातील तरुण पिढी
लाभनायकांमुळे बरबाद
पुरुषोत्तम जाधव यांनी साधला मांढरदेवी येथील युवक, कार्यकर्त्यांशी संवाद
वाई : वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील तरुण पिढी गुंडगिरी व व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागली असून हजारो कुटुंब यामुळे उदध्वस्त झाली आहेत. मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम नाही. मात्र, लाभनायक आमदारांनी गावोगावी युवकांची ससेहोलपट चालवली आहे. या झुंडशाहीला जाब कोण विचारणार? सर्वच सत्ता त्यांच्या घरात असल्याने जनतेने न्याय मागायचा कुणाकडे? मात्र आता तरुण पिढीने न भीता समोर येऊन विद्यमान आमदारांना जाब विचारण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी मांढरदेव (ता. वाई) येथील तरुणांच्या गाठीभेटीदरम्यान व्यक्त केले.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ज्या भुईंज गावची ओळख खासदारांचे गाव सुसंस्कृत विचारांचे गाव भृगुऋषिंच्या पदस्पर्शाने पावन झालेले भुईंज गाव अशी ओळख होती. त्या भुईंज गावातील १७ युवकांवर एकाच वेळी मोक्का लागतो ह्याला विकास म्हणायचा का? अशा लाभनायकाला हटवा आणि किटली चिन्हांचे बटन दाबून सुसंस्कृत विचारांच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवा. तसेच गावोगाव दोन गट पाडायचे. त्यात एखादा विकासकामांचा शेंगदाणा टाकायचा आणि दोन गटात झुंज लावून द्यायची ही प्रवृत्ती वेळीच रोखली नाही, तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही.
ठेकेदारांची गावोगावी झुंडशाही
वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघात विद्यमान आमदारांनी आपले बगलबच्चे कॉन्ट्रॅक्टर सांभाळून त्यांच्यामार्फत गावोगावी झुंडशाही सुरू केली आहे. प्रत्येक गावात गुंडगिरीच्या माध्यमातून दडपशाही आणली जात आहे. मात्र, सामान्य जनता आता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. असे मत पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!