प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन शक्तीप्रदर्शनाने आमदार दीपक चव्हाण यांचा अर्ज दाखल

 


प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन

शक्तीप्रदर्शनाने आमदार दीपक

चव्हाण यांचा अर्ज दाखल

आठ विधानसभा निवडणुकीसाठी १२ उमेदवारांची १४ नामनिर्देशनपत्रे दाखल

सातारा : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्ष महाविकास आघाडीकडून फलटण कोरेगावचे मागील तीन टर्म आमदार असलेल दीपकराव चव्हाण यांनी आज तुतारी व हलगीच्या निनादात मोठे शक्तीप्रदर्शन करीत महाविकास आघाडीतर्फे आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

फलटणचे आराध्य दैवत प्रभू श्रीराममाचे दर्शन घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करीत आमदार दीपक चव्हाण यांनी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

विधानसभा निवडणूक 2024 साठी 12 उमेदवारांची 14 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. यामध्ये 258- माण मध्ये 3 उमेदवारांची 3 पत्रे, 260- कराड दक्षिण 2 उमेदवारांची 2 नामनिर्देशनपत्रे आणि 262- सातारा दोन उमेदवारांची 2 नामनिर्देशनपत्रे , 257-कोरेगाव 2 उमेदवारांची 2 नामनिर्देशनपत्रे, 255-फलटण 1 उमेदवाराचे 3 नामनिर्देशन, 256-वाई 2 उमेदवारांचे 2 नामनिर्देशनपत्र अशी एकूण 12 उमेदवारांची 14 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. दि. 22 ऑक्टोंबरपासून आजअखेर 39 उमेदवारांची 47 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. 

258- माण विधानसभा मतदार संघातून 3 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये बजरंग रामचंद्र पवार अपक्ष, प्रसाद मल्हारराव उंबासे अपक्ष, महेश मारुती कर्चे यांचा समावेश आहे.

260- कराड दक्षिण मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये विद्याधर कृष्णा गायकवाड बहुजन समाज पार्टी, गणेश शिवाजी कापे अपक्ष. 

262- सातारा मतदारसंघामध्ये 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये दादासाहेब वसंतराव ओव्हाळ अपक्ष, हणमंत देविदास तुपे अपक्ष.

257- कोरेगाव मतदार विधानसभा मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. चंद्रकांत जाणू कांबळे वंचित बहुजन आघाडी, दादासाहेब वसंतराव ओव्हाळ अपक्ष.

255- फलटण मतदार विधानसभा मतदारसंघात एका उमेदवारांनी तीन नामनिर्देशपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आमदार दीपक प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरचंद्र पवार.

256- वाई मतदार विधानसभा मतदारसंघात 2 उमेदवारांनी 2 नामनिर्देशपपत्र दाखल केले आहे. यामध्ये प्रदीप रामदास माने अपक्ष, विनय अबुलाल जाधव अपक्ष.

261- पाटण, 260 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी निरंक आहे.

Post a Comment

0 Comments