सडा दाढोलीतील वयोवृद्ध मतदारांचा पाटण तालुका प्रशासनाकडून सत्कार

 


सडा दाढोलीतील वयोवृद्ध

मतदारांचा पाटण तालुका

प्रशासनाकडून सत्कार

सातारा : पाटण तालुक्यातील सडा दाढोली येथील वयोवद्ध पुरुष व महिलांचा पाटण तालुका प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले.

यावेळी वयोवृद्ध मतदारांचा सत्कार करण्याबरोबर भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचीही माहिती मतदारांना देण्यात आली. 

चला मतदान करुया, देशाची प्रगती घडवूया, बुढे हो या जवान चलो मिलकर करे मतदान, मतदान आपला अधिकार निवडू मनाजोगे सरकार, जागरुक मतदार लोकशाहीचा आधार अशा विविध आशयाचे महिलांनी बोर्ड घेऊन गावातून प्रभात फेरी काढली. आम्ही गावातील महिला विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करणार असल्याचीही ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments