वसंतराव मानकुमरे, शशिकांत शिंदे, अतुल भोसले, सुरेश भोसले यांचे उमेदवारी अर्ज दाखल
सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १७ उमेदवारांची २० नामनिर्देशन पत्र दाखल झाली. यात सातारा जावली- विधानसभेसाठी वसंत रामचंद्र मानकुमरे यांनी अर्ज दाखल केला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी आ. शशिकांत शिंदे, वैशाली शिंदे, कराड दक्षिण मतदारसंघासाठी अतुल भोसले, सुरेश भोसले आदी मान्यवरांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण आजअखेर ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या बलाढ्य उमेदवारांनी अत्यंत साधेपणात माजी सैनिक, वारकरी, मुख्य कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यात शशिकांत शिंदे अतुल भोसले यांनी डमी अर्ज भरले आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ साठी आज १७ उमेदवारांची २० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. यामध्ये २५८ - माणमध्ये दोन उमेदवारांची २ उमेदवारी अर्ज, २६० - कराड दक्षिण मतदारसंघात ६ उमेदवारांचे ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २६२ - सातारा विधानसभेसाठी २ उमेदवारांनी २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २५७ - कोरेगाव विधानसभेसाठी ७ उमेदवारांनी ८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज एकूण १७ उमेदवारांची २० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. दि. २२ ऑक्टोबरपासून आजअखेर २७ उमेदवारांची ३३ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये २५८ - माण विधानसभा मतदारसंघातून २ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये संदिप जर्नादन खरात अपक्ष, शिवाजीराव शामराव मोरे अपक्ष यांचा समावेश आहे.
२६० - कराड दक्षिण मतदारसंघामध्ये अतुल सुरेश भोसले भारतीय जनता पार्टी, सुरेश जयवंतराव भोसले भारतीय जनता पार्टी, गोरख गणपती शिंदे अपक्ष, विश्वजीत अशोक पाटील अपक्ष, इंद्रजित अशोक गुजर अपक्ष, रविंद्र वसंतराव यादव अपक्ष.
२६२ - सातारा मतदारसंघामध्ये वसंत रामचंद्र मानकुमरे अपक्ष, राजेंद्र निवृत्ती कांबळे अपक्ष असे दोन उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
२५७ कोरेगाव मतदार विधानसभा मतदार संघात जालिंदर शंकर गोडसे शिवसेना, शशिकांत जयवंतराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार, वैशाली शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार, उद्धव आत्माराम कर्णे अपक्ष, ॲड. संतोष गणपत कमाने अपक्ष, सचिन सुभाष महाजन अपक्ष, उमेश भाऊ चव्हाण अपक्ष, जालिंदर शंकर गोडसे अपक्ष असे अर्ज दाखल झाले आहेत.
२६१ - पाटण, २६० - कराड उत्तर, २५५ फलटण आणि २५६ - वाई विधानसभा मतदार संघाची आकडेवारी निरंक आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!