ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये महिलांनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे

 


ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये


महिलांनी गिरवले स्वरक्षणाचे धडे


साताऱ्यात ७० महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना घेतला 


सातारा : ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे नुकतेच स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. सेंटरमधील सुमारे ७० महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीपासून ते भयावह अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी स्वतःचे रक्षण कसे करावे याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 


छेडछाडीच्या घटनांमध्ये महिलांना विरोध करण्याचे योग्य तंत्र माहीत नसल्याने त्यांना अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो. मात्र, अशावेळी न घाबरता स्वसंरक्षण कसे करता येईल, याचे प्रशिक्षण या कार्यशाळेच्या माध्यमातून घेता येईल. कराटे, तायक्वान्डो आणि मार्शल आर्टस् असोसिएशनद्वारे हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अचानक हल्ला झाल्यास काय करावे, वैयक्तिक सुरक्षिततेसाठी प्रभावी तंत्र याठिकाणी शिकवण्यात आले. ज्यामुळे महिलांमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव तसेच सुरक्षेची भावना निर्माण झाली.


या सत्रात महिलांना विविध प्रकारच्या बचाव तंत्रांचा वापर कसा, कधी आणि कुठे करायचा याचे धडे देण्यात आले. कराटेचे पायाभूत शिक्षण, स्वसंरक्षणाच्या गोष्टींचा वापर, प्रसंगानुसार कसे वागायचे याची माहिती या प्रशिक्षणातंर्गत देण्यात आली. प्रत्येक महिलेला आत्मसंरक्षण करता आलेच पाहिजे अशीच प्रतिक्रिया या सत्राचे प्रशिक्षक अजित सोनवणे यांनी व्यक्त केली.




या सत्रात संजय सोनावणे (आयडियल्स कराटे तायक्वान्डो आणि मार्शल आर्टस् असोसिएशन चे संस्थापक) हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. पुष्पलता मोतलिंग, डॉ. दीपाली देसाई, प्रशिक्षक किशोर पवार व त्यांचा विद्यार्थी उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments