किरोली येथे रेल्वे मार्गावरील
पुलाची उंची व रुंदी वाढवा
सुधारित मागणीनुसार मंजुरी न मिळाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
सातारा : कोरेगाव तालुक्यातील किरोली येथे जिल्हा मार्ग 33 वर रेल्वे ट्रॅक खाली असणारा बोगदा वजा पूल खूपच कमी उंचीचा आणि अरुंद आहे. परिणामी सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी विशेषतः ऊस वाहतुकीसाठी हा बोगदावजा छोटा पूल असून अडचण आणि नसून खोळंबा ठरला आहे. रेल्वे ट्रॅकखालील या बोगदावजा पुलाची उंची आणि रुंदी वाढवून हा मार्ग सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी योग्य बनवावा, अशी मागणी किरोली ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, कोरेगाव तालुक्यातील किरोली येथील प्रमुख जिल्हा मार्ग ३३ वरील रेल्वे मार्गावरील नाली क्रमांक ३३९ ही ३ मीटर रुंद व ३ मीटर उंच आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वाहतूक करण्यास अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्या जागेवर ५ मीटर उंच व ६ मीटर रुंद RUB करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. दि. १३ ऑक्टोबरपर्यंत सुधारित मागणीनुसार मंजुरी न मिळाल्यास दि. १४ रोजी तारगाव रेल्वे स्टेशन येथे रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोरपडे यांच्यासह किरोली ग्रामस्थांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील किरोली येथील प्रमुख जिल्हा मार्ग ३३ वरील रेल्वे मार्गावरील नाली क्रमांक ३३९ ही ३ मीटर रुंद व ३ मीटर उंच असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये वाहतूक करण्यास मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीला मार्ग नसल्यामुळे रेल्वे रुळावरून ही वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची प्रमाण वाढले आहे. रेल्वे रुळावर अपघात होऊन पाच ते सहा जनावरेही दगावले आहेत. त्याचप्रमाणे नोकरी व सातारा येथे कामानिमित्ताने येथील नागरिकांना नियमित ये -जा करावी लागत आहे. मात्र, येथील नालीची दुरावस्था झाली असून, या ठिकाणी नालीची उंची व रुंदी कमी असल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. शिवाय पावसाळ्याच्या दिवसात या नालीमध्ये पाणी साठल्यामुळे वाहतूक सुरळीत होत नसून पर्यायाने रेल्वे रुळावरून ये-जा करावी लागत आहे. पावसामुळे येथील नाली मार्ग बंद पडण्याच्या स्थितीत आहे. नालीजवळील पूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर राडारोडा झाला आहे.
नालीच्या पलीकडे किरोली गावची ५०० एकर शेती जमीन, गणेश मंदिर, गावची स्मशानभूमी व इतर गावांना जोडणारा एकच पर्याय मार्ग आहे. हा प्रमुख जिल्हा मार्ग असल्याने या मार्गाला एकंबे, अपशिंगे, पिंपरी, वाठार किरोली, किरोली फत्त्यापूर, कामेरी वाया सातारा असा जोडलेला आहे. या नालीमध्ये ४ फूट ते ५ फूट पाणी साठून राहात आहे. प्रमुख जिल्हा मार्गावर ही प्रचीमा ३३ वर असल्याने भविष्यात रस्त्याच्या रुंदी करणास अडचण येणार नाही. त्यामुळे आम्हास ५ मीटर उंच ६ मीटर रुंद RUB करण्यात यावा, अशी मागणी गेल्या दहा वर्षापासून किरोली ग्रामस्थ करीत आहेत.
जर दि. १३ ऑक्टोबरपर्यंत सुधारित मागणीस मंजुरी न मिळाल्यास दि. १४ ऑक्टोबरपासून तारगाव स्टेशन (ता. कोरेगाव) येथे सकाळी वाजता रेल्वे रोको आंदोलन करणार आहे, असल्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोरपडे, किरोली ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिला आहे.
यावेळी किरोलीचे माजी सरपंच शिवाजी चव्हाण, भिकाजी चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, श्रीकांत चव्हाण, युवराज चव्हाण, प्रज्वल चव्हाण, रेखा चव्हाण सरपंच, धनाजी चव्हाण उपसरपंच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!