खोटं बोलणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी

 


खोटं बोलणाऱ्या काँग्रेसला

 मतदारांनी हरवलं : गोसावी

हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है : भारतीय जनता पार्टी

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या साताऱ्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आज साताऱ्यात जल्लोष करून पेढे वाटून आनंद साजरा केला.

हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याबद्दल आणि जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या वेळी पेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्याबद्दल, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील राजवाड्याजवळील गोल बागेसमोर आनंदोत्सव साजरा केला आणि नागरिकांना पेढे वाटून त्यांचे तोंड गोड केले.

यावेळी बोलताना भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सांगितले की भाजप संविधान बदलणार असा नेरेटीव सेट करून लोकसभेला जिंकण्याचा काँग्रेसने, इंडि आघाडीने प्रयत्न केला, परंतु हरियाणा आणि जम्मू कश्मीर या ठिकाणी झालेला विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ही चाल दलित बांधवांच्या लक्षात आली त्यांनी दोन्ही विधानसभेत भारतीय जनता पार्टीला भरघोस मते दिली आणि काँग्रेस आणि इंडी आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली, दोन्ही राज्यात पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या विकासात्मक मुद्द्याला मतदान झाले, त्याचप्रमाणे 370 कलम काढल्यानंतर मोठा हिंसाचार होईल, गदारोळ होईल, देश अस्थिर होईल अशा वल्गना करणारी काँग्रेस आणि इंडि आघाडी सपशेल तोंडावर आपटली, जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता निवडणुका झाल्या, जम्मू काश्मीर मध्ये भारतीय जनता पार्टीला जरी सत्ता मिळाली असली तरीही मतांची टक्केवारी आणि विधानसभेच्या जागा वाढलेल्या आहेत.

जनमताचा हा कौल पाहता महाराष्ट्रातील विधानसभेत सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार येईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

यावेळी भारत माता की जय , वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, हरियाणा तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या, आणि सातारकर नागरिकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, वैशाली टंकसाळे, नितीन कदम, चंदन घोडके, नगरसेवक सुनील काळेकर, अप्पा कोरे, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, बेटी बचाओ बेटी पढाओ आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, अनिकेत निकम, सातारा शहर उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, नजमा बागवान, सातारा शहर चिटणीस विजय नाईक, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सातारा शहर अध्यक्ष रोहिणी क्षीरसागर, ओबीसी मोर्चा महिला सातारा शहर अध्यक्ष गौरी गुरव, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक प्रथमेश इनामदार, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक सुनील लाड, संतोष चिकणे, नरेंद्र सावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments