सातारा, कोरेगाव येथे सोयाबीन आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू


सातारा, कोरेगाव येथे सोयाबीन

आधारभूत किंमत खरेदी केंद्र

सुरू : सुद्रिक, काळे यांची माहिती

सातारा : खरीप हंगाम २०२४ - २०२५ मध्ये नाफेडमार्फत आधारभूत किंमत योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी करण्यासाठी उत्पादित सोयाबीन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी करून विक्री करावयाची आहे. यासाठी सातारा तालुका खरेदी विक्री संघ मार्केट यार्ड सातारा व कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ मार्केट यार्ड कोरेगाव या संघाकडे खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे, अशी माहिती सातारचे सहकारी संस्था, उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक व कोरेगाव सहकारी संस्था, सहायक निबंधक प्रीती काळे यांनी दिली आहे. 

ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी अद्ययावत ७/१२ उतारा, खरीप हंगाम २०२४ मध्ये सोयाबीनची पीक पाणी नोंदीसह आधारकार्ड, आधारशी लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन माल घेऊन येताना तो स्वच्छ असावा. मालाची आद्रता आद्रता कमाल १२ टक्के असावी. मालामध्ये काडीकचरा, माती व डाळ नसावी. याबाबतीत मार्गदर्शक सूचना खरेदी केंद्रावर लावण्यात आलेल्या आहेत. यांची नोंद सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी. अधिक माहितीसाठी सातारा - ९६२३४९५६३७, कोरेगाव ९९२२३९४८३३) या संघाकडे संपर्क साधावा, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments