मी मतदान करणार स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ

 


मी मतदान करणार

स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ

फलटणमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते सुरुवात

सातारा : फलटण येथील सजाई गार्डन फलटण येथे मी मतदान करणार स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ 255- फलटण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

फलटण विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान हक्क बाजवण्यासाठी घरा बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहनही श्री. ढोले यांनी केले. स्वाक्षरी मोहीमचे फलक फलटण शहरातील गर्दीच्या असणाऱ्या ठिकाणी ठेवण्यात येऊन मतदारामध्ये मतदान जनजागृतीचा अनोखा उपक्रमद्वारे राबविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments