भाजपाची बदनामी खपवून
घेणार नाही : तालुकाध्यक्ष गाडे
संबंधितांवर कारवाईसाठी पोलिसांकडे लेखी तक्रारीद्वारे मागणी
सातारा : बनावट नावे टाकून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याची बातमी व्हिडिओ आणि इतर माध्यमातून आली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची बदनामी झाल्याबद्दल भाजपाचे सातारा ग्रामीण पश्चिमचे तालुकाध्यक्ष महेश गाडे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक तांबे यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.
जे कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते कधीच नव्हते त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे फडे घालून, त्यांचा प्रवेश केला असा उन्माद दीपक पवार यांनी केला आहे. वास्तविक पाहता ज्यांच्या मागे कार्यकर्तेच नाहीत त्यांनी स्टंट म्हणून हा प्रकार केला. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन फोटो, व्हिडिओ प्रसारित केला. याबाबत पूर्ण माहिती घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली
यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा ग्रामीण पश्चिमचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, सरचिटणीस वैभव यादव, सरचिटणीस प्रदीप जाधव, जिल्हा कार्यकारी सदस्य राजू शेटे, युवा मोर्चा सरचिटणीस गौरव इंगवले, मार्केट कमिटी संचालक रमेश चव्हाण, कामठी गावचे सरपंच रुपेश चव्हाण, विजय चव्हाण, अनिकेत चव्हाण व कामठी गावचे नागरिक उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!