लायन्स क्लब अजिंक्य साताराचे संस्थापक मा. बी. एस. जाधव आणि इतर पदाधिकारी. डॉ. अर्जुन शिंदे (वरिष्ठ सल्लागार व डीसी कर्करोग स्क्रिनिंग ) अप्पी आमची कलेक्टर मालिका फेम मकरंद गोसावी आणि शिवानी नाईक, अंजली देशमुख, सुवर्णा शेवाळे ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे फाउंडर चेअरमन उदय देशमुख, मॅनेजिंग डायरेक्टर सचिन देशमुख व इतर पदाधिकारी.
टिव्ही कलावंतांनी केला
लढवय्या कर्करुग्णांना सलाम
साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये कर्करुग्णांना गुलाबपुष्प देऊन केला गौरव
सातारा : दरवर्षी २२ सप्टेंबर हा दिवस जागतिक रोज दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. तो साजरा करण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी खंबीरपणे लढा देणाऱ्या रुग्णांना आधार देणे व त्यांच्या यशस्वी लढ्याचा गौरव करणे.
यानिमित्ताने साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर आणि लायन्स क्लब अजिंक्य सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रोज डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॅन्सरग्रस्त रुग्णांचे दु:ख कमी करण्यासाठी आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील शिवानी नाईक (अप्पी) आणि मकरंद गोसावी (स्वप्निल सर ) हे कलावंत उपस्थित होते. या कलावंताच्या हस्ते सेंटरमधील कर्करुग्णांना गुलाबाचे फुल आणि फळे देत, कर्करोगाविरुध्दच्या त्यांच्या लढाईचे कौतुक करण्यात आले.
यावेळी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री उदय देशमुख, डॅा अर्जून शिंदे ( वरिष्ठ सल्लागार व डीसी कर्करोग स्क्रिनींग),हॉस्पिटल चे मॅनेजिंग डायरेकटर सचिन देशमुख, हॉस्पिटल चे डायरेकटर रिसॉर्स डॉ प्रताप राजेंमहाडिक, लायन्स क्लब अजिंक्य सातारा प्रेसिडेंट अरविंदजी शेवाळे , लायन्स क्लब अजिंक्य साताराचे संस्थापक मा. बी. एस. जाधव वा लायन्स क्लबचे इतर पदाधिकारी, प्रख्यात इतिहासकार निलेशजी झोरे आणि आणि चित्रपट महामंडळ अध्यक्ष सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष मा. महेशजीं देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कॅनडातील १२ वर्षांची मेलिंडा रोज हिला खूप लवकर ब्लड कॅन्सर झाला. तिने आपल्या सहा महिन्यांच्या काळात तिने ब्लड कॅन्सरशी निकराची झुंज दिली. मेलिंडाने धैर्याने कॅन्सरशी दिलेल्या लढ्यासोबतच इतर रुग्णांना दिलेल्या प्रेरणेच्या गौरवाप्रीत्यर्थ तिच्या मृत्युनंतर जागतिक रोज डे साजरा केला जातो. या निमित्त साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे कॅन्सरशी यशस्वी लढा दिलेल्या व्यक्तींच्या मदतीने जनजागृती करण्यात आल्याची प्रतिक्रिया ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री उदय देशमुख यांनी व्यक्त केली. या आजाराशी लढणं इतकं त्रासदायक असतं की रुग्णाची मानसिक कसोटी लागते. अशावेळी या रुग्णाला मानसिकरित्या आधार देणे गरजेचे आहे हे ओळखून याठिकाणी हा रोज डे साजरा केल्याचे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!