साताऱ्यात रन फॉर नेशन दौड उत्साहात

 


साताऱ्यात रन फॉर नेशन

दौड उत्साहात

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांना न्याय दिला, सन्मान केला, महिलांच्या उन्नतीकरणासाठी अनेक योजना आखल्या, त्या राबवल्या आणि पूर्ण केल्या.

नारिशक्ती वंदन अंतर्गत जे विविध कार्यक्रम होत आहेत, त्यामध्ये महिला नवमतदार, एनजीओचे प्रतिनिधी आणि महिला बचत गट समन्व्यक यांच्या सहभागाने महिलांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आज दि. चार मार्च रोजी संपूर्ण भारतात नारिशक्ती वंदन दौडचे आयोजन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात सातारा शहरातील शिवतीर्थ ते आनंदवाडी दत्त मंदिर या मार्गांवर भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ सुनीशाताई शहा यांच्या संयोजनाखाली नारिशक्ती वंदन दौडचे आयोजन करण्यात आले.


शिवतीर्थवर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना झेंडा दाखवून, शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी शिट्टी वाजवल्यानंतर या दौडला सुरुवात करण्यात आली. आनंदवाडी दत्त मंदिर येथे बक्षीस समारंभ होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, कोरेगाव विधानसभा निवडणूकप्रमुख प्रियाताई शिंदे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने-कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णा पाटील, स्वाती पिसाळ, प्रदेश चिटणीस सुनीशा शहा, कविता कचरे, अरुणा बंडगर पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, डॉ. सचिन साळुंखे, धनंजय पाटील, रवी आपटे, चिटणीस निशा जाधव, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैष्णवी कदम, दैवशिला मोहिते, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष गौरी गुरव, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष कल्याण राक्षे, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्ष रीना भनगे, रोहिणी क्षीरसागर, वैशाली भिलारे, सविता पवार, कुंजा खंदारे, वैशाली टंगसाळे, पायल जाधव, चित्रा माने, नंदा इंगवले, वंदना उत्तेकर, दामिनी सपकाळ, दीपाली कदम, भारती गस्ती, रेणुका ढोणे, सुवर्णा काळे, विजयश्री देशपांडे, कलावती ढोणे, नितीन बर्गे, डॉ. शेखर घोरपडे, धीरज सोनवले, यशराज माने, राजन मामनिया, गीता मामनीया, अभिजित माने, तनिश शहा, निलेश शहा, तुषार डोकेफोडे, सचिन मालवणकर, भरत मूनोत, यश माने, ओम बोराटे, सोहम फाळके, ऋषी शिंदे, अश्विन वायदंडे, विराज घाडगे, आयुष फाळके, निखिल करपे यांची प्रमुख उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments