सातारकरांचा अयोध्येत घुमणार "जय श्रीराम"चा नारा

 


सातारकरांचा अयोध्येत

घुमणार "जय श्रीराम"चा नारा 

सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना घेऊन आस्था रेल्वे अयोध्येला रवाना

सातारा : अयोध्येमध्ये जय श्रीराम जवळ जवळ 491 वर्षांचे परकीय आक्रमण, 83 लढाया, कित्येक आंदोलने आणि अनेक हुतातम्यांच्या संघर्षपूर्ण बलिदानानंतर भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांतून श्रीराम जन्मभूमीवर एक भव्य मंदिर उभे राहिले आहे. हे मंदिर समस्त भारतीयांच्या आस्थेचे प्रतीक आहेच! त्याचबरोबर सर्व विश्वातील प्रथम पसंतीचे पर्यटन स्थळ होण्याकडे अयोध्येची वाटचाल सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अयोध्या बघता यावी, प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे " आस्था " रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघातून या "आस्था" रेल्वे ने 1368 भाविक अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. 


आज ही रेल्वे सातारा रेल्वे स्टेशन (माहुली ) येथून अयोध्येसाठी रवाना झाली. सर्व स्टेशन "जय श्रीराम "च्या घोषणांनी दणाणून गेले होते. रेल्वेच्या खिडक्यावर भाजपाचे झेंडे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक बोगीला श्रीराम भक्तांच्या स्वागताचे बॅनर झळकत होते. सर्वांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. एकमेकांना जय श्रीराम म्हणतं भाविक फोटो, सेल्फी काढत होते.

रेल्वेने नाष्टा, चहा, जेवण, पाणी याची अत्यंत सुंदर व्यवस्था केली आहे. भाजपाचे फक्त 40 पदाधिकारी या रेल्वेमधून पाठवले आणि त्यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या रेल्वेसाठी मुख्य जबाबदारी एकनाथ बागडी यांच्यावर देण्यात आली आहे.


यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, डॉ. प्रियाताई शिंदे, कराड उत्तर निवडणूकप्रमुख मनोज घोरपडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि झेंडा दाखवून रेल्वे सोडण्यात आली. 


या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णाताई पाटील, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुनीशाताई शहा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभीताई भोसले, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष गौरीताई गुरव, सातारा विधानसभा निवडणूकप्रमुख अविनाश कदम, माण विधानसभा निवडणूकप्रमुख सोमनाथ भोसले, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सुनील शिंदे, मनीषा पांडे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीण पश्चिम अध्यक्ष महेश गाडे, जावळी अध्यक्ष श्रीहरी गोळे, कराड उत्तर अध्यक्ष शंकरराव शेजवळ, कोरेगाव पूर्व मंडल अध्यक्ष निलेश नलावडे, वाई ग्रामीण मंडल अध्यक्ष दीपक ननावरे, युवा नेते विक्रमशील कदम, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस जमदाडे, कदम यांच्यासह विविध पदाधिकारी, रामभक्त व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments