आदिवासी बांधवाना शासकीय
योजनांचा लाभ मिळवून देणार
जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम; भाजपाचा आदिवासी पाड्यावर "घर चलो "
सातारा : भारतीय जनता पार्टीचे ब्रीद असलेले " अंत्योदय " हे सत्यात उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील सर्व घटकांच्या, सर्व जाती जमातीच्या उन्नतीसाठी अनेक प्रयत्न केले, अनेक योजना अमलात आणल्या.
भारतीय जनता पार्टीचे अंत्योदयाचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी, शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत सर्व योजना पोहोचण्यासाठी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज सातारा शहरातील गोडोली येथील गौड समाज वस्तीला भेट दिली. तेथील आदिवासी बांधवांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जास्तीत जास्त समस्यांचे निराकरण करण्याची खात्री दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुल, शौचालय, हर घर नल से जल, उज्वला गॅस, मुलींना मोफत शिक्षण, रेशन कार्ड काढून मोफत धान्य, आरोग्य सेवा, आयुष्यमान भारत आणि इतर योजना या आदिवासी पाड्यावर राबवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. वस्ती मधील लहान मुला-मुलींना खाऊ वाटप केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, भटक्या विमुक्त आघाडी महिला जिल्हाध्यक्ष प्रियाताई नाईक, अनुसूचित जमाती प्रदेश चिटणीस सदाशिव नाईक, आदिवासी गौड समाज अध्यक्ष शंकर उईके, स्वप्नील सोनवणे, पोइना उईके, काकासाहेब जोशी, आर्यन जोशी व समाजाचे बंधू भगिनी उपस्थित होत्या.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!