दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
सातारा : हिवरे (ता. कोरेगाव) येथे माती नालाबांधामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋतुराज रोहिदास गुजले (वय १४) व वेदांत रोहिदास गुजले (वय १२) असे मृत मुलांचे नाव आहे. हिवऱ्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.
काल शाळेला सुटी असल्याने त्यांची आई सुवर्णा गुजले यांनी दोन मुलांना शेतामध्ये नेले. आईचे खुरपणीचे काम चालले होते. या वेळी दोघे भावंडे शिवारात जनावरे चारत होती. दुपारी आईने दोन्ही मुलांना शेतात बोलावून जेवण घातले. पुन्हा ही मुले जनावरे चारण्यासाठी शिवारात गेली. दरम्यानच्या काळात ते दोघे शेताजवळ असलेल्या नाईक इनामदार शिवारातील माती नालाबांधात पोहण्यासाठी गेली. ऋतुराज यास पोहण्यास येत होते. मात्र, वेदांत यास पोहण्यास येत नव्हते. सायंकाळी पाच वाजता त्यांची आई त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी येथील शिवारात गेली तेव्हा माती नालाबांधा जवळ गेली असता तिला बांधाजवळ दोघांची कपडे दिसली. मात्र, दोघे मुले दिसली नसल्याने सुवर्णा गुजले यांनी ही माहिती त्यांचा पती रोहिदास गुजले यांना दिली.
रोहिदास हे साखर कारखान्यावर उसाचा ट्रॅक्टर घेऊन गेल्याने त्या ठिकाणी रोहिदास यांचा भाऊ नीलेश गुजले हा माती नालाबांधाजवळ पोचला. दरम्यान, गावातील तरुणांच्या मदतीने माती बांधामधील पाण्यात शोध घेतला असता रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान पाण्यामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची फिर्याद नीलेश गुजले यांनी वाठार पोलिस ठाण्यात दिली असून, तपास पोलिस हवालदार उदय जाधव करीत आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!