'उन्नत्ती व उत्कर्ष सोसायटी
परिवाराचे
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस
अर्थसहाय्य
संस्थापक हनुमंत रांजणे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे निधी सुपूर्द
महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये संस्थांचे ६४ शाखांचे जाळे
मुंबई : रिझर्व्ह बँक मान्यताप्राप्त एनबीएफसी 'उन्नत्ती फिन्सर्व प्रा. लि.' आणि 'उत्कर्ष को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.' यांनी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्य निधीला महत्त्वपूर्ण आर्थिक मदत देऊन महाराष्ट्राच्या विकासात आपला वाटा उचलला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये या संस्थांचे ६४ शाखांचे विस्तृत जाळे आहे.
वहागाव (ता. जावली) येथील मूळ निवासी असलेले संस्थापक श्री. हनुमंत बळवंत रांजणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उन्नत्ती आणि उत्कर्षचे मुख्य कार्यालय सानपाडा, नवी मुंबई येथून कार्यरत आहे. ६०० कोटींहून अधिक एकत्रित व्यवसाय असलेल्या या समूहाने आजवर ५५० हून अधिक युवक-युवतींना रोजगाराची संधी दिली आहे.
सूक्ष्म लघु कर्ज, सोनेतारण कर्ज आणि मालमत्ता तारण कर्ज यांसारख्या सेवांच्या माध्यमातून संस्थेने शेकडो लहान उद्योजकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. जावली तालुक्यातील करहर येथेही संस्थेची शाखा कार्यरत आहे.
संस्थेच्या या योगदानाच्या निमित्ताने, संस्थांच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी माहितीपुस्तिका राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सादर करण्यात आली. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि वनमंत्री गणेशजी नाईक यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली.
याप्रसंगी संस्थापक श्री. हनुमंत रांजणे, व्यवस्थापकीय संचालक अभिजित रांजणे, अध्यक्ष सुशिल गोळे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव मानकुमरे उपस्थित होते.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!