खासदार संजय राऊत हे मोठे नेते

 


खासदार संजय राऊत हे मोठे नेते

सहकारमंत्री दिलीप वळसे - पाटील

सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते नेहमीच वेगवेगळी विधान करत सल्ले देतात. प्रभू रामचंद्र हे सर्वांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आपण देवाला देवाच्या जागी ठेवूया... असा सल्ला सहकारमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना दिला.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांनिमित्ताने साताऱ्यात आले होते. संजय राऊत यांनी राममंदीर उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका केली होती. भाजपने आता फक्त राम लल्लालाच निवडणुकीत उभ करायचं राहीलयं, अशी टीका केली होती. याबाबत वळसे पाटील यांना पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

अजित पवार यांना अध्यक्ष करण्यासाठी खासदार शरद पवारांनी बैठक बोलावली होती. मात्र, तेव्हा अजित पवार अध्यक्षपद नको म्हणाले होते, असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला होता. यावर दिलीप वळसे-पाटील म्हणाले, माझ्यासमोर अशी चर्चा झाली नव्हती. मला त्याबाबत काहीही माहीत नाही, असं सांगत वळसे-पाटील यांनी यावर भाष्य करणे टाळले.

जीगाव प्रकल्पात थेंबभर पाणी नाही, हे धरण अजून पूर्ण झालं नाही. मग ३३०० कोटींचं टेंडर कशासाठी निव्वळ ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी आणि ठेकेदारांना निवडणुकीपूर्वी ३३०० कोटींचा ठेका देण्याचा प्रयत्न दिसतोय, असा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी सरकारवर केला आहे. त्याबाबतही दिलीप वळसे-पाटील यांनी मौन बाळगत हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारा, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र येण्याची शक्यता फारच कमी असल्याचे व घड्याळ या चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगच करेल, असे मत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments