गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
शिरवळ पोलिसांचा दणका!
३४ जणांवर प्रतिबंधात्मक मनाई आदेश
तहसीलदार रविराज जाधव यांचा आदेश
खंडाळा | प्रतिनिधी
गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरवळ पोलीस व खंडाळा प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ३४ व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. गणेशोत्सव सोमवार, दि. १४ सप्टेंबर ते शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. या काळात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
शिरवळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी पोलीस रेकॉर्डवरील संबंधित व्यक्तींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तसेच त्यांच्या हालचालींमुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा प्रस्ताव खंडाळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रविराज जाधव यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत तहसीलदार रविराज जाधव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३(२) अन्वये संबंधित व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.
या कारवाईत बेकायदेशीर हत्यारांचा वापर, मारहाण, दुखापत व गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, बेकायदेशीर घरात प्रवेश, मालमत्तेचे नुकसान, शिवीगाळ, चोरी, दंगा, हल्ला, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, जबरी चोरीसह दुखापत, जातीवाचक भाष्य, खुनाचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर अतिक्रमण आदी गुन्ह्यांमध्ये सहभागी अथवा पोलीस रेकॉर्डवर असलेल्या व्यक्तींचा समावेश असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक आदेशातील संबंधित व्यक्तींमध्ये रितेश दिलीप किर्वे, मनोज पांडुरंग पवार, अनिकेत राजेंद्र कांबळे, अनिल उर्फ पाप्या शामराव वाडेकर, सोमनाथ उर्फ माऊली शंकर राऊत, सुनीकेत संतोष माने, पारस विश्वास भोसले, बाळा भानुदास मंजुळे, रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख, अय्याज इकबाल शेख, ओंकार राजेंद्र कांबळे, अविष्कार विलास कांबळे, अर्जुन उर्फ अविनाश सतीश पिसाळ, ओंकार दत्तात्रय क्षिरसागर, शुभम उर्फ सोन्या रमेश पंडित, शाहरुख इस्माईल पठाण, विजय उर्फ शामा बापू पाचे, योगेश गुलाब शिवतरे, वैभव राजू भरगुडे, वेदांत जितेंद्र जाधव, रॉकी हरिदास बाला, करण दत्तात्रय महांगरे, विशाल शेखर वाडेकर, रामा दादा मंडलिक, हृषीकेश उर्फ लंब्या विजय रणवरे, अहमद रजा अमीर भालदार, यश विलास कबुले, अजिंक्य उर्फ पप्पू अलबत कांबळे, इम्रान उर्फ पप्पू कलाम काझी, शेखर शिवाजी नेवसे, रोहित सुभाष सुर्वे, पंकज मोहन वीर आणि योगेश धर्मराज बामणे यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सार्वजनिक शांतता अबाधित राहावी आणि उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी शिरवळ पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. ३४ जणांवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!