चारचाकी वाहनांच्या बॅटरी
चोरीप्रकरणी दोघे ताब्यात
सातारा शहर डी.बी. पथकाची कारवाई
९ बॅटऱ्या व दुचाकीसह १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा | प्रतिनिधी
सातारा शहरातील चारचाकी वाहनांच्या बॅटरी चोरीच्या घटनांचा तपास करताना सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या असल्याचा संशय असलेल्या ९ चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहरातून चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरीस जाण्याच्या घटनांचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डी.बी. पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाकडून रात्रीच्या गस्तीवेळी संशयित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या गस्ती दरम्यान एक पुरुष व महिला विनानंबरच्या दुचाकीवरून काही वस्तू घेऊन जाताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात चारचाकी वाहनांच्या दोन बॅटऱ्या आढळल्या. तसेच दुचाकीच्या मालकीबाबत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, संबंधित दोघांनी मागील महिनाभराच्या कालावधीत सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी सात चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी आणखी सात बॅटऱ्या हस्तगत केल्या.
या कारवाईत एकूण ९ बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी, असा एकूण १,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या बॅटऱ्या व दुचाकीबाबत पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी रोहित शिवाजी जाधव (वय २४, रा. गोसावी वस्ती, सैदापूर, ता. जि. सातारा) आणि सुरेखा शिवाजी जाधव (वय ४५, रा. गोसावी वस्ती, सैदापूर, ता. जि. सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच पोलीस कर्मचारी निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे आणि वैभव माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!