शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत जयश्रीताई गिरी यांचा वाढदिवस उत्साहात; कुडाळ येथे अभिष्टचिंतन सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत

जयश्रीताई गिरी यांचा

वाढदिवस उत्साहात

कुडाळ येथे अभिष्टचिंतन सोहळा

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ (ता. जावली) येथील जय दत्तगुरु मंगल कार्यालयात सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. जयश्रीताई सुहास गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित राहून जयश्रीताई गिरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही जयश्रीताई गिरी यांचे अभिष्टचिंतन करत त्यांना पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जयश्रीताई गिरी या जिल्हा परिषद सदस्या म्हणून कार्यरत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त जावली तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे कार्यक्रमाला राजकीय तसेच सामाजिक स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, पंचायत समितीचे सभापती सौरभबाबा शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, ह.भ.प. सुहास गिरी, जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संदीप परमणे, विजू आप्पा शेलार, मच्छिंद्रआप्पा क्षीरसागर, दादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा किसान मोर्चाचे रवी परमणे, किसान मोर्चा जावली तालुकाध्यक्ष राहुल माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जयश्रीताई गिरी यांना शुभेच्छा देत त्यांच्या आगामी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. दरम्यान, वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी जयश्रीताई गिरी यांच्या सार्वजनिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्यरत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments