शांताबाई जंगम यांचे निधन
कुडाळ | प्रतिनिधी
हुमगाव येथील रहिवासी श्रीमती शांताबाई शंभूअय्या जंगम (वय ७८) यांचे गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दैनिक सकाळचे पत्रकार तथा हुमगावचे माजी सरपंच श्री. भाऊसाहेब जंगम व प्रतिष्ठित नागरिक श्री. शितलकुमार जंगम यांच्या त्या आई होत.
शांताबाई जंगम यांच्या निधनाने जंगम परिवारासह हुमगाव परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. शांताबाई जंगम यांचा सावडणे विधी शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जंगम मळा, हुमगाव-वालुथ रोड येथे होणार आहे. तसेच उत्तरकार्याचा विधी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त करून जंगम परिवाराप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. शांताबाई जंगम यांच्या निधनाने जंगम परिवारावर कोसळलेल्या दुःखात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, जिल्हा सातारा परिवार सहभागी आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!