ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर
सातारा : सातारा शहराच्या ऐतिहासिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सातारा नगरपालिकेचे नगरसेवक श्री. पंकज चव्हाण यांनी प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माझ्याकडे केली होती. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या मागणीची दखल घेत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पत्राद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या विषयाचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
या पाठपुराव्याला यश आले असून, नगर विकास विभागाच्या ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत सातारा नगरपरिषदेस श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक उद्यान विकसित करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी नगर विकास विभागामार्फत उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष आभार. तसेच या विकासकामासाठी सकारात्मक सहकार्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांचेही मनःपूर्वक आभार.
मंजूर निधीतून उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यात येणार असून, ऐतिहासिक वारसा जपत नागरिकांसाठी सुंदर हरित परिसर, वॉकिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्यांची सुविधा आणि आवश्यक विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
सातारा शहराच्या ऐतिहासिक ओळखीला साजेसे आणि नागरिकांसाठी अधिक आकर्षक व सुविधायुक्त उद्यान उभे राहावे, हा या प्रयत्नामागील उद्देश आहे. उद्यानाच्या विकासाची मागणी माझ्याकडे मांडून सातत्याने पाठपुरावा करणारे नगरसेवक श्री. पंकज चव्हाण यांचेही अभिनंदन.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!