पालकमंत्र्यांचे पंढरपूर यात्रेचे
नियोजन ठरले कौतुकास्पद
मंत्री जयकुमार गोरे यांचा ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या हस्ते सत्कार
सातारा | प्रतिनिधी
पंढरपूरची आषाढी यात्रा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा असताना, या यात्रेचे नियोजन सुरळीत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यात आले. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच यात्रा काळात सुरक्षितता आणि व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात आले. या यशस्वी नियोजनाबद्दल पंचायत राज व ग्रामविकासमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करत अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी बोराटवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या वतीने मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला.
पंढरपूर यात्रेदरम्यान राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, निवास, पाणी, आरोग्य तसेच इतर मूलभूत सुविधांचे योग्य नियोजन करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून यात्रा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आल्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी झालेल्या या सदिच्छा भेटीत राज्यातील विविध विकासकामे, ग्रामविकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणारी गती तसेच डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा झाली. बदलत्या काळात डिजिटल पत्रकारिता अधिक प्रभावी होत असून, ग्रामीण आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यात डिजिटल माध्यमांची महत्त्वाची भूमिका असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, महासचिव विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पाणसंडे, सचिव लिंगराज साखरे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे तसेच डॉ. संतोष जोगदंड उपस्थित होते.
मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत संघटनेच्या आगामी उपक्रमांसह पत्रकार आणि डिजिटल मीडिया क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवरही विचारविनिमय झाला. भेटीमुळे संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवादाला अधिक बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!