पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक
रस्ता अवजड वाहनांसाठी बंद
१० जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीत मोठा बदल
सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांची माहिती
संतोष शिराळे | सातारा
सातारा शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या मार्गावरील काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अन्वये आदेश जारी करत १० जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे.
सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून सध्या येथे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. कामादरम्यान एकाच मार्गिकेतून वाहतूक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी : पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक; बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका
या दोन्ही मार्गांवर एसटी बस, ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टर व सर्व मालवाहू अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग
शहराबाहेर जाणारी वाहने : सातारा एसटी स्थानक - जुनी जिल्हा मध्यवर्ती बँक - पोलीस परेड मैदान - पारंगे चौक - जुना आरटीओ चौक - वाढे फाटा.
शहरात येणारी वाहने : वाढे फाटा - जुना आरटीओ चौक - पारंगे चौक - सातारा एसटी स्थानक.
या वाहनांना प्रवेश : दुचाकी, चारचाकी, शाळेच्या बसेस, कार, ऑटो रिक्षा, रुग्णवाहिका, पोलीस व अग्निशमन दलाच्या वाहनांना पूर्ववत प्रवेश राहणार आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!