संग्रहित छायाचित्र
शेणोलीत एमडी ड्रग्जसह एकाला अटक
कराड तालुका पोलिसांची मोठी कारवाई
80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
विधीसंघर्ष बालक ताब्यात
संतोष शिराळे | सातारा
अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग देत कराड तालुका पोलिसांनी शेणोली बसस्थानक परिसरात सापळा रचून एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) विक्रीसाठी आलेल्या दोघांवर कारवाई केली. या कारवाईत 1.890 ग्रॅम मेफेड्रोन, दोन मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 80 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अजय यशवंत कापूरकर (रा. जुळेवाडी, ता. कराड) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेल्या विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कराड तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक शितल कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेणोली बसस्थानक परिसरात सापळा रचला. संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 1.890 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) आढळून आले. त्यासोबतच दोन मोबाईल फोन आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली.
ही कारवाई डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक शितल कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय तावरे, पोलीस हवालदार राजू पाटोळे, धनंजय कोळी, शशिकांत काळे, संजय जाधव, विजय यादव, सचिन चिंचकर आणि प्रतिभा डेरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!