मध्यस्थी करण्यासाठी
पुढे आलेल्या महिला
शिक्षिका गंभीर जखमी
वाई पोलिसांत गुन्हा दाखल
मुख्याध्यापकावर निलंबनासह कठोर कारवाईची मागणी
वाई | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील खावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र हादरले आहे. विद्यार्थ्याला होत असलेली मारहाण थांबविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिला शिक्षिकेलाच मुख्याध्यापकाने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. या हल्ल्यात शिक्षिका गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शाळेचे कामकाज सुरू असताना मुख्याध्यापक एका विद्यार्थ्याला काठीने मारहाण करत होते. विद्यार्थ्याचा आक्रोश ऐकून शाळेतील महिला शिक्षिका घटनास्थळी धावत आल्या. विद्यार्थ्याला होणारी मारहाण थांबविण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला. मात्र, संतापलेल्या मुख्याध्यापकाने विवेक गमावत थेट त्या शिक्षिकेवरच काठीने हल्ला केला. या मारहाणीत शिक्षिका गंभीर जखमी झाल्या.घटनेनंतर जखमी शिक्षिकेला तातडीने वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे वाई तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलांसमोर शाळेच्या परिसरात घडलेल्या या प्रकाराचा पालक आणि ग्रामस्थांनी निषेध केला आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांनी संबंधित मुख्याध्यापकाला तात्काळ निलंबित करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!