फलटणमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांचे रामराजेंकडून स्वागत

फलटणमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या

पालखी सोहळ्यानिमित्त

वारकऱ्यांचे रामराजेंकडून स्वागत

फलटण | प्रतिनिधी

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त फलटण नगरीत आगमन झालेल्या लाखो वारकरी बंधू-भगिनींचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर (महाराज साहेब) यांनी मनःपूर्वक स्वागत केले आहे. यावेळी श्रीमंत सौ. वैदेहीराजे रामराजे नाईक-निंबाळकर (राणीसाहेब) यांनीही वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. "माऊलींच्या पदस्पर्शाने फलटण नगरी पावन झाली असून सर्व वारकरी बंधू-भगिनींचे मनःपूर्वक स्वागत आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पालखी आगमनामुळे फलटणमध्ये भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments