हद्दवाढीतील सात कर्मचाऱ्यांचे
सातारा पालिका सेवेत समावेशन
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते आदेश वाटप
संतोष शिराळे, सातारा |
सातारा शहराच्या हद्दवाढीच्या अंमलबजावणीला महत्त्वाचा वेग देत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या पुढाकाराने हद्दवाढ क्षेत्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शाहूपुरी, खेड, दरे खुर्द आणि विलासपूर येथील सात कर्मचाऱ्यांचा सातारा नगरपरिषद सेवेत समावेश करण्याचे आदेश सोमवारी पारित करण्यात आले.
समावेशन झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये श्री. दशरथ पिसे, श्री. सुधीर कदम, श्री. राहुल खंडागळे, श्री. मनोहर अहिरेकर, सौ. वैशाली कोकरे, श्री. अनिल शिंदे आणि सौ. पूनम माने यांचा समावेश आहे.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते समावेशन आदेश प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, नगरसेवक अक्षय जाधव, आस्थापना प्रमुख श्रीमती शिंगाडे तसेच श्री. चेतन जोशी उपस्थित होते.
हद्दवाढीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या समावेशनामुळे कर्मचाऱ्यांचा सेवाविषयक मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर हद्दवाढ क्षेत्रातील नागरी सुविधा आणि प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
हद्दवाढीतील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या समावेशनाची प्रक्रिया देखील टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!