संत ज्ञानेश्वर माऊली
पालखी सोहळ्यात
वारकऱ्यांच्या सेवेसाठी
डराडो संस्थेचे आवाहन
फलटण | प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांना चहा, बिस्किटे, पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच इतर आवश्यक सेवा पुरविण्याचा संकल्प डराडो (DARADO NGO) परिवाराने केला आहे. या सेवाकार्यात नागरिकांनी स्वेच्छेने आर्थिक मदत तसेच आवश्यक वस्तूंचे योगदान देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेच्या माहितीनुसार, पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुडे, चहासाठी लागणारे साहित्य, साखर, दूध आदी वस्तूंची गरज असून, इच्छुक नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे. देणगीची रक्कम मोठी किंवा लहान यापेक्षा सेवाभावाला अधिक महत्त्व असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
देणगी देताना संबंधित क्यूआर (QR) कोड हा डराडो संस्थेचाच असल्याची खात्री करूनच आर्थिक मदत करावी, जेणेकरून देणगी योग्य ठिकाणी पोहोचेल, असे आवाहनही करण्यात आले आहे. डराडो संस्थेच्या म्हणण्यानुसार, पालखी मार्गावरील हजारो थकलेल्या वारकऱ्यांना एक कप चहा, एक पाण्याची बाटली किंवा बिस्किटाचा पुडा देणे हीच खरी संतसेवा आणि मानवसेवा आहे.
या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात (डायरेक्टर, डराडो NGO) यांच्याशी मो. ९१७५२ ८११९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!