सासवड-जेजुरी मार्गावर भीषण अपघात; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

तीन महिला वारकऱ्यांचा 

मृत्यू, चार गंभीर जखमी

सासवड-जेजुरी मार्गावर भीषण अपघात

जेजुरी | प्रतिनिधी

आषाढी वारीदरम्यान सासवड-जेजुरी मार्गावर वारकऱ्यांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून चार वारकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जेजुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. संतप्त वारकऱ्यांनी ट्रकचालकाला पकडून मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत ट्रकचालकाला ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे आषाढी वारीदरम्यान वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments