सातारा शहर पोलिसांची कारवाई
सराईत मोटारसायकल चोर जेरबंद
चार दुचाकी जप्त
संतोष शिराळे, सातारा :
सातारा शहर परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत मोटारसायकल चोराला अटक केली आहे. युवराज आकोबा निकम (वय ५६), रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाला मोटारसायकल चोरांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार डी.बी. पथकाने वाढे फाटा परिसरात संशयित हालचालीवर लक्ष ठेवून एका व्यक्तीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल आढळून आली. चौकशीत ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासात आरोपीने आणखी तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
संशयित आरोपी युवराज आकोबा निकम (वय ५६), रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा याच्याकडून हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच-11-सीपी-7364), होंडा शाईन (एमएच-11-सीयू-2299), हिरो HF डिलक्स (एमएच-11-एएस-4549), हिरो HF डिलक्स (एमएच-11-एजे-7108) मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे सातारा शहर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे, बोरगाव पोलीस ठाण्यातील एक गुन्हा तसेच आणखी एका दुचाकी चोरीचा उलगडा झाला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सातारा शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!