सातारा जलसमृद्ध अभियानाचा जावळी तालुक्यात शुभारंभ; दरे खुर्द येथे 'जलतारा' कामांना प्रारंभ

जलसमृद्ध अभियानाचा 

जावळी तालुक्यात शुभारंभ

दरे खुर्द येथे 'जलतारा' कामांना प्रारंभ

मेढा | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या 'सातारा जलसमृद्ध अभियान' अंतर्गत जावळी तालुक्यातील दरे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये आज (दि. 10 जुलै 2026) विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत 'जलतारा' कामांचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश जलसंधारण, भूजल पातळी वाढविणे, पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देणे हा आहे. अभियानाच्या माध्यमातून जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत.

यावेळी कृषी अधिकारी राजाराम लोखंडे, कृषी अधिकारी सत्यजीत शिंदे, तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामरोजगार सेवक, ग्रामरोजगार सहाय्यक तसेच शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जलसंवर्धनाचे महत्त्व, योजनेचे उद्दिष्ट आणि उपलब्ध होणाऱ्या लाभांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या योजनेमुळे जलसाठ्यात वाढ होण्याबरोबरच शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरे खुर्द ग्रामपंचायतीत सुरू झालेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामांना गती मिळणार असून, गावातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments