‘लोकशाहीतील स्वातंत्र्यसैनिक पंजाबराव पाटील’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन



'लोकशाहीतील स्वातंत्र्यसैनिक

पंजाबराव पाटील’ पुस्तकाचे

सोमवारी कराड येथे प्रकाशन

राजू शेट्टी, आ. सदाभाऊ खोत, महादेव जानकर व आ. बच्चुभाऊ कडू यांची उपस्थिती

कराड : झुंजार शेतकरी नेते व बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या जीवनावरील पूर्वा प्रकाशन कराड यांनी प्रकाशित केलेल्या व पत्रकार विकास भोसले यांनी लिहिलेल्या संघर्षमय कहानीचे लोकशाहीतील स्वातंत्र्यसैनिक पंजाबराव पाटील या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजता कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारक येथे होणार आहे. 

हा पुस्तक प्रकाशन सोहळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड येथील डॉ. अशोक गुजर, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

पंजाबराव पाटील यांच्या या पुस्तक प्रकाशनासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य बी. जी. काका पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेशदादा शेवाळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments