अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या
पुस्तक स्टॉलचे कुमारी
निखिलेश्वरीच्या हस्ते उद्घाटन
साताऱ्यात पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन उत्साहात
सातारा : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन शनिवार दि. ९ मे व रविवार दि. १० मे रोजी उत्साहात पार पडले. या संमेलनात विविध साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक उपक्रमांमुळे नागरिक व वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या संमेलनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शाखेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासह विविध वैचारिक विषयांवरील पुस्तकांचा स्टॉल उभारण्यात आला. या स्टॉलवर विजय शिरसाट, संजय मालती कमलाकर, आर. एस. कवडे, बाळकृष्ण लोंढे, पुणे शहर सचिव सचिन सोनावले यांचे सुनियोजन तसेच भारत विठ्ठलदास यांच्या चमत्कार निर्मूलन प्रयोगांमुळे वाचकांची मोठी गर्दी झाली.
शनिवारी सकाळी समितीच्या स्टॉलचे उद्घाटन कुमारी निखिलेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. कुमारी निखिलेश्वरी या तृतीयपंथी असून, तृतीयपंथीय समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती व्हावी, या उद्देशाने त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष हभप डॉ. सुहास फडतरे तसेच पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाधिपती हभप भारत महाराज जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट देण्यात आले. समितीचे पुणे शहर सचिव सचिन सोनावले यांनी उपलब्ध करून दिलेल्या हभप अॅड. देवदत्त परुळेकर लिखित संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच अन्य संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलनावरील विचारांचा समावेश असलेले दहा पुस्तकांचे संच विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!