पणजी गोवा येथे ४ मे रोजी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाअधिवेशन


पणजी गोवा येथे ४ मे रोजी

डिजिटल मीडिया संपादक 

पत्रकार संघटनेचे 

महाअधिवेशन

संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी केली तयारीची पाहणी

पणजी /प्रतिनिधी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी परिसरात जाऊन केली.


यावेळी गोवा अधिवेशन कोअर कमिटीची बैठक कला अकादमीच्या कार्यालयात पार पडली. यावेळी संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीशभाऊ सावंत, महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर, केंद्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, केंद्रीय महासचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य प्रसिद्धीप्रमुख धिरज शेळके, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना केंद्रीय अध्यक्ष राजा माने म्हणाले, गोवा येथे होणारे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन होणार असून गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची सर्व टीम अत्यंत नियोजनबद्ध काम करीत आहे. देशभरातील हजारो संपादक पत्रकार या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून, संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी या अधिवेशनासाठी अधिकृत नावनोंदणी १५ एप्रिल २०२६ पर्यंत आपापल्या जिल्हाध्यक्षांकडे करावी.


यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले, "गोवा राज्याला ऐतिहासिक व पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे गोवा येथे होणारे अधिवेशन अधिक दर्जेदार व सर्वांच्या ज्ञानात भर पडणारे असे होईल यासाठी आम्ही सर्व आपल्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत."

संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाची तयारी सुरू झालेली आहे. ४ मे २०२६ रोजी गोव्याच्या या ऐतिहासिक कला अकादमीच्या सभागृहात हे अधिवेशन होतंय. या अधिवेशनाचे प्रमुख संयोजक म्हणून गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील आणि गोव्यातील टीम या तयारीला लागलेली आहे. आज महाराष्ट्रातील टीम आणि डिजिटल मीडियाची राष्ट्रीय आणि प्रदेशची कार्यकारणी या ठिकाणी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी आलेली आहे. मला समाधान वाटतंय की या ऐतिहासिक भूमीत, या ऐतिहासिक सभागृहात निश्चितपणाने डिजिटल मीडियाचं राष्ट्रीय महाअधिवेशन गाजणार.

- राजा माने, राष्ट्रीय अध्यक्ष

हे जे महाधिवेशन आहे ते अधिक चांगल्या स्वरूपात लोकांच्या स्मरणात राहावं, म्हणजे जे काही संपादक मंडळी वेगवेगळ्या ठिकाणाहून ये आहेत, त्या सगळ्यांच्या स्मरणात राहावं अशा रीतीने करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सर्वांसाठी इथल्या काही चांगल्या नोंदी आहेत, चांगल्या स्मृती आहेत त्या घेऊन जाण्यासाठी हे अधिवेशन अधिक अधिक आकर्षक पद्धतीने... नुसतं खानं-पिणं हा काय भाग असेलच. गोवा हे एक अतिशय महत्त्वाचं वर्ल्ड हेरिटेज डेस्टिनेशन आहे, त्यामुळे इथं तुम्हाला ते मिळतीलच, ते सगळे अनुभव असतीलच. खानं पिण्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक तुमचं विचारमंथन होईल, संघटनेचं काम वाढण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न होतील, या सगळ्या अनुषंगाने काही प्रयत्न होण्यासाठी हे महाधिवेशन लोकांच्या, मंडळाच्या म्हणजे एकूण सगळ्या ह्या कार्यकारिणीच्या स्मरणा राहील याची काळजी मी घेईन, हे मी तुम्हाला आता सांगतो.

- अनिल पाटील, गोवा प्रदेशाध्यक्ष



पणजी : डिजिटल संपादक पत्रकार संघटनेचे गोवा पणजी येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष गोवा राज्याचे समाज कल्याणमंत्री सुभाष फळ देसाई यांनी पद स्वीकारले. गोवा पणजी येथे मंत्रालयात पत्र देताना मा राजा माने साहेब व सर्व पदाधिकारी.


पणजी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांनी अभिवचन दिले. महा
अधिवेशनासाठी निमंत्रण देताना पदाधिकारी.

Post a Comment

0 Comments