उद्या महामेळाव्याचे आयोजन
जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची माहिती
सातारा : भारतीय जनता पार्टीच्या ४६ वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी स्थापना दिन ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.०० वाजता हॉटेल लेक व्ह्यू येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
या मेळाव्यासाठी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, नामदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार मनोजदादा घोरपडे, भारतीय जनता पार्टी स्थापनादिन अभियान महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक विक्रम पावसकर, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्णजी वेताळ, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले, सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, पाटण विधानसभेचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यासाठी माननीय नामदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रमुख वक्ता म्हणून मेळाव्यास संबोधित करणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, आघाड्या मोर्चे यांचे प्रदेश, जिल्हा, मंडल पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका नगरसेवक, बूथ अध्यक्ष, बूथ सदस्य, कार्यकर्ते, नागरिकांनी या मेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, सातारा जिल्हा सरचिटणीस, भाजपा स्थापना दिन अभियान जिल्हा संयोजक जयकुमार शिंदे यांनी केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!