साताऱ्यात सव्वादोन लाखाच्या
12 मोटारसायकली हस्तगत
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनिय कामगिरी
सातारा : येथील एमआयडीसी ऑफिसजवळील बसस्टॉप पिकअप शेडजवळ दोन मोटारसायकल चोरांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून जिल्ह्यातील 12 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करून त्यांच्याकडून 2,15,000 रुपये किमतीच्या 12 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी केली आहे. या कारवाईत ओंकार भाऊसो माने (वय 20) रा. दहिवडी रोड, स्वामी समर्थ मंदिराजवळ वडूज, ता. खटाव जि. सातारा, व विधी संघर्षग्रस्त बालक या दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार करून त्यांना जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. दि. 29/04/2026 रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी ऑफिस सातारा येथील बसस्टॉप पिकअप शेडजवळ दोन व्यक्ती नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी घेवून आल्याची माहिती मिळतात तपास पथकाने दोन व्यक्तींना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकाने दि. 29/04/2026 रोजी 16.10 वा. सुमारास एमआयडीसी ऑफिस येथे सापळा लावून मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींना त्याच्या ताब्यातील नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. दोन्ही व्यक्तींकडे विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यात मिळालेली मोटारसायकल ही त्यांनी मार्च 2025 मध्ये कॉटेज हॉस्पिटल कराड येथून चोरी केली असल्याचे सांगीतल्याने त्यांच्याकडे आणखी विचापूस केली असता त्यांनी कराड, वडूज, औंध परिसरातून आणखी 12 मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. नमुद पथकाने ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून 2,15,000 रुपये किमतीच्या एकुण 13 मोटारसायकल हस्तगत करून 12 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
संशयित आरोपींकडून आणखी गुन्हे उघड केस आणले आहेत. त्यामध्ये 1) कराड शहर पोलीस स्टेशन 295/2025 भा.न्या.सं.क. 303(2),3(5), 2) वडुज पोलीस स्टेशन 312/2024 भा.न्या.सं.क. 303(2), 3) वडूज पोलीस स्टेशन 292/2024 भा.न्या.सं.क. 303(2), 4) वडूज पोलीस स्टेशन 306/2024 भा.न्या.सं.क. 303(2), 5) वडूज पोलीस स्टेशन 308/2024 भा.न्या.सं.क. 303(2), 6) वडूज पोलीस स्टेशन 295/2024 भा.न्या.सं.क. 303(2), 7) औंध पोलीस स्टेशन 37/2025 भा.न्या.सं.क. 303(2), 8) कराड शहर पोलीस स्टेशन 1284/2024 भा.न्या.सं.क. 303(2), 9) कराड शहर पोलीस स्टेशन 1417/2024 भा.न्या.सं.क. 303(2), 10) कराड शहर पोलीस स्टेशन 1268/2024 भा.न्या.सं.क. 303(2), 11) कराड शहर पोलीस स्टेशन 1609/2024 भा.न्या.सं.क. 303(2), 12) कराड शहर पोलीस स्टेशन 345/2024 भा.न्या.सं.क. 303(2).
निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिष घाडगे, राजू मुलाणी, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, प्रविण कांबळे, अमित सपकाळ, अमित माने, अजय जाधव, अमित झेंडे, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, स्वप्नील शिंदे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वी जाधव, प्रविण पवार, रवि वर्णेकर, शिवाजी गुरव यांनी ही कारवाई केली आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!