जिल्हाधिकारी साहेब,
जिल्ह्यातील वाढत्या
गॅसटंचाईचा विस्कळीतपणा
पूर्वपदावर आणा
...अन्यथा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गणेश भिसे, संजय गाडे यांचा सोमवारी जनआंदोलन करण्याचा इशारा
सातारा : जिल्ह्यातील वाढती गॅस टंचाईबाबत निर्णय घेऊन सर्वांना गॅस सिलेंडर उपलब्धतेची व्यवस्था करणेबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष गणेश भिसे, संजय गाडे यांनी दिले.
इराण, ईस्त्राईल अमेरिका युद्धामुळे गॅस तुटवडा मुंबईसह संपूर्ण राज्याला जाणवू लागला आहे. जिल्ह्यात इंडियन, भारत, एचपी गॅस एजन्सी समोर नागरिकांची भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काळाबाजार सुद्धा वाढू लागला आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना काळाबाजाराने गॅस सिलेंडर खरेदी करणे म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार मोदी आणि फडणवीस सरकारच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
इराण बरोबर भारताने कसे संबंध ठेवावे याबाबत अमेरिका डोनाल्ड ट्रम्प निर्णय घेत आहेत, यावरून मोदींची हतबलता दिसून येत आहे. मोदींचे एफस्टीन फाइलमध्ये आलेले नाव यामुळे ट्रम्प बोले मोदी हले अशी अवस्था झाली आहे. मोदींनी स्वतःला वाचवण्यासाठी अमेरिकेसोबत मैत्रीचे संबंध ठेवले आहे. परंतु इराणसोबत दुरावा राखून आहेत. या सर्व बाबी देशासाठी घातक आहेत. मोदींनी अमेरिकेकडे देशाची अस्मिता, देशाचा स्वाभिमान गहाण ठेवल्याचे लोकांचे मत बनत चालले आहे.
गॅस तुटवडामुळे महिला परेशान झाल्या आहेत. खानावळी, हॉटेल बंद पडत चालल्याने विद्यार्थ्यांवर तसेच नोकरी कामासाठी आलेल्या नोकरदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही या सर्व घटनांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करतो आणि जिल्हा प्रशासनाला आवाहन करतो, की आपण याबाबत तात्काळ निर्णय घेवून गॅस तुटवडामुळे जिल्ह्यातील विस्कळीत होत चालली परस्थिती नियंत्रणात आणावी व सातारकर नागरिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून होणारी गैरसोय टाळावी, अन्यथा येत्या सोमवारी मोठ्या स्वरूपाचे जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला.
यावेळी चंद्रकांत कांबळे, सुहास मोरे, शशिकांत गंगावणे, रवि वायदंडे, दत्तात्रय सावंत, सतीश कांबळे, शशिकांत खरात, नागेश सातपुते, ऋतुराज चांदणे, नलिनी घाडगे, सुनीता येवले, पायल गाडे, प्रतीक गाडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!