सातारा येथे ५० खाटांच्या
आयुष रुग्णालयास मंजुरी
ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून हिरवा कंदील
सातारा- राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा येथे ५० खाटांच्या आयुष रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारच्या केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून सर्व सोयींनीयुक्त, आवश्यक मनुष्यबळ, अत्याधुनिक पायाभूत व इतर सुविधांनी युक्त अशा ५० खाटांच्या जिल्हा एकात्मिक आयुष रुग्णालयास मंजुरी मिळाली असून जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा (जे.पी. नड्डा), भारताचे केंद्रीय आयुष मंत्री (राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
प्रस्तावित जिल्हा एकात्मिक आयुष रुग्णालय येथे मिळणाऱ्या सुविधा :
● आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वैद्यकीय अधिकारी यांचे तपासणी कक्ष
● वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी व इतर आयुष वैद्यकीय अधिकारी
● मुळव्याध, भगंदर यासाठी क्षारसुत्र सुविधा
● पंचकर्म सुविधा (स्नेहन स्वेदन अभ्यंग वमन विवेचन नस्य रक्तमोक्षण व बस्ती)
● इतर कर्म (कटीबस्ती, मन्याबस्ती, जानुबस्ती, शिरोधारा, नेत्रतर्पण, अग्निकर्म, विद्धकर्म, कपिंग)
● अर्धांगवायू रुग्णांसाठी आयुर्वेद पद्धतीने मोफत उपचार
● युनानी चिकित्सा पद्धतीद्वारे त्यांच्याकडील पंचकर्म म्हणजे इलाज बीर तदबीर सेवा
● दैनंदिन योगसत्रा बरोबर आजारांप्रमाणे व्यक्तीपरत्वे थेरपीटिक योग सल्ला
● आयुर्वेदोक्त गर्भसंस्कार तसेच एएनसीमध्ये मासानुमासिक उपचार व योग
● लहान बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबिर
● आयुर्वेदोक्त प्रकृती परीक्षण
● आयुर्वेदोक्त अग्नी व कोष्ठ परीक्षण
● होमिओपॅथी उपचार
● आयुष तज्ञांकडून टेली मेडिसिन सुविधा
● आयुर्वेदानुसार विवाहपूर्व समुपदेशन
आयुष रुग्णालयामधील पायाभूत सुविधा
इमारत वैद्यकीय कक्ष -
● भव्य दोन मजली इमारत
● जनरल वार्ड २ (महिला व पुरुष)
● स्पेशल रूम ४
● ऑपरेशन थिएटर - मेन ओटी व मायनर ओटी
● आयुर्वेद होमिओपॅथी युनानी वैद्यकीय अधिकारी यांचे तपासणी कक्ष
● मोठा योगा हॉल - योग प्रशिक्षक
● धन्वंतरी वनौषधी उद्यान
मनुष्यबळ
● वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी व इतर आयुष वैद्यकीय अधिकारी
● असिस्टंट मेट्रन १ व स्टाफ नर्स १२, लेखापाल, मसाजिस्ट, औषध निर्माता, क्लर्क, चौकीदार, आया, स्वयंपाकी असे एकुण ६९ पदे उपलब्ध होणार आहेत.
या रुग्णालयामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी पद्धतीचे अत्याधुनिक उपचार रुग्णांना साताऱ्यातच मिळणार असून रुग्णांच्या पैशांची आणि वेळेची बचत होणार आहे. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेला बळकटी मिळणार असून याचा लाभ जिल्ह्यातील जनतेला निश्चित होईल, असा विश्वास ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला आहे.
सातारा मेडिकल हब होणार
५० खाटांच्या आयुष रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. सातारा येथे लवकरच १०० खाटांचे कामगार रुग्णालय, याशिवाय बीएससी नर्सिंग सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा रुग्णालयात कॅथलॅब, एमआरआय, सिटी स्कॅनचे काम सुरु आहे. सातारा येथे मेडिकल कॉलेजचे काम युद्धपातळीवर सुरु असून याठिकाणी दुसरे कॅथलॅब लवकरच सुरु होत आहे. उपचारासाठी जिल्ह्यातील रुग्णांना पुणे, मुंबई अथवा अन्य शहरात जावे लागू नये, त्यांच्यावर साताऱ्यातच सर्व प्रकारचे उपचार व्हावेत, यासाठी हरप्रकारे प्रयत्न सुरु असून लवकरच सातारा एक दर्जेदार मेडिकल हब होईल, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!