युवा आयडॉल, प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते मोहन बेलोशे यांचे आज अभिष्टचिंतन


युवा आयडॉल, प्रसिद्ध उद्योजक,

सामाजिक कार्यकर्ते मोहन बेलोशे

यांचे आज अभिष्टचिंतन


शांत, मितभाषी अभ्यासात हुशार असलेले आमचे वर्गमित्र मोहन बेलोशे यांचा आज वाढदिवस

बांधकाम व्यवसायाच्या जोरावर दापवडी पंचक्रोशीत वाढवला नावलौकिक

जीवनज्योत सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे

समाजकार्याची ओढ असलेले मोहन बेलोशे हे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष

दापवडी हायस्कुलच्या नूतन इमारत उभारणीत मोलाचा वाटा

मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव 

युवा आयडॉल, प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते मोहन बेलोशे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे, निमित्ताने त्यांच्यावर मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

शांत, मितभाषी अभ्यासात हुशार असलेल्या आमचे वर्गमित्र मोहन बेलोशे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या बांधकाम व्यवसायाचा जोरावर समस्त दापवडी पंचक्रोशीत आपला नावलौकिक वाढवला आहे.

बांधकाम व्यवसायाबरोबर ते सामाजिक कार्यातही ते अग्रेसर आहेत. त्यांना असलेली समाजकार्याची ओढ आपण वेळोवेळी कामातून पाहिली आहे. जीवनज्योत सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. 

माजी विद्यार्थी संघटनेत ते सक्रिय आहेत. दापवडी हायस्कुलच्या नूतन इमारत उभारणीमध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. काटवली गावातील युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत. सतत हसतमुख चेहऱ्याने लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे.


काटवली गावच्या विकासात मग ते बसस्थानकाचे नूतनीकरण असो, स्वागत कमानीचे बांधकाम असो किंवा प्राथमिक शाळेतील विकासकामे असो प्रत्येक कामात अग्रेसर राहून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताने उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..!

Post a Comment

0 Comments