डिजिटल मीडिया संपादक
पत्रकार संघटनेच्या
सातारा जिल्हाध्यक्षपदी
संतोष शिराळे यांची
एकमताने फेरनिवड
संस्थापक प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान
सातारा : आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांचे प्रश्न आणि उपेक्षितांच्या समस्यांना वाचा फोडणारे अनुभवी पत्रकार संतोष शिराळे यांची 'डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडीमुळे जिल्हयातील पत्रकारिता क्षेत्रातून शिराळे यांचे विशेष कौतुक होत आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते शिराळे यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, राज्य समन्वयक तेजस राऊत, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र माजी अध्यक्ष विकास भोसले, राज्य समन्वयक संघटक व पत्रकार पदाधिकारी उपस्थित होते.
मूळचे जावळी तालुक्यातील वहागाव या धरणग्रस्त गावातील असलेले संतोष शिराळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. त्यांनी दैनिक तरुण भारत, सामना, पुण्यनगरी, लोकमत, सकाळ या नामवंत वृत्तपत्रांमध्ये वृत्त संपादक, उपसंपादक या पदांवर प्रदीर्घ काळ काम केले असून 'महाराष्ट्र टाइम्स, लोकशिवाय मराठी व स्टोरी डॉट कॉम' यांसारख्या नामवंत न्यूज चैनलमध्ये काम आहे. या काळात त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडले आहेत. केवळ समस्या मांडून न थांबता त्या सोडवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यांच्या याच सामाजिक जाणिवेची आणि प्रदीर्घ अनुभवाची दखल घेत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने फेरनिवड करून त्यांच्याकडे पुन्हा जिल्ह्याचे नेतृत्व सोपवले आहे.
सातारा येथील बैठकीस विविध तालुक्यातून आलेले पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिराळे यांच्या निवडीचे स्वागत करताना उपस्थितांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या अनुभवामुळे सातारा जिल्ह्यात डिजिटल मीडिया क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि संघटनात्मक बळ अधिक वृद्धिंगत होईल. डिजिटल युगात पत्रकारांच्या हक्कासाठी आणि या माध्यमाच्या सक्षमीकरणासाठी शिराळे यांचे नेतृत्व प्रभावी ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हयातील राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!