श्री सिध्दोबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात रथोत्सव उत्साहात
म्हसवड : ‘सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रथोत्सुवामुळे म्हसवड नगरी गुलालमय झाली होती.
महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असणार्या येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी रामचंद्र गुरव यांच्या घरुन वाजत-गाजत रथामध्ये दुपारी अडीच वाजनेच्या सुमारास बसवण्यात आल्या. यावेळी मानाच्या सासन काठ्यांची भेट झाल्यावर श्रींच्या मूर्तींच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून श्रीमंत अजितराव राजेमाने, तेजसिंह राजेमाने,दिपसिंह राजेमाने,बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, विश्वजित राजेमाने तसेच ,माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत,तहसीलदार विकास अहिर, तहसीलदार बाई माने,मुख्याधिकारी डॉ सचिन माने,सपोनि अक्षय सोनवणे, अभयसिंह जगताप यांच्या उपस्थितीत रथोत्सवास प्रारंभ झाला.
श्रींचा विवाह सोहळा महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापने दिवशी हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह दिवशी श्री सिध्दनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होवून शुक्रवारी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दुपारी २ वाजून ४७ मिनिटाने श्रींचा रथ नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. यावेळी भाविकांनी सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं च्या गजरात रथावर गुलाल व खोबर्याची उधळण केली. तसेच अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून यावर्षी माणनदीपात्रात पाणी असल्याने रथ पूर्वापार चालत आलेल्या मार्गाने न जाता बायपास रस्त्यावरुन नगरपालिका, महात्मा फुले चौक ते बसस्थानक चौकातुन सातारा - पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिध्दनाथ यांच्या बहिणीस मानकर्यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरुन खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आले. त्यानंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरुन रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.
यावर्षी प्रशासनाने भाविकांच्या वाहनांची पार्किंग शहरालगत केल्याने भाविकांना त्रास कमी सहन करावा लागला.तसेच नगरपरिषदेने पाण्याची सोय चांगल्या प्रकारे सोय केली होती.
भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळातर्फे कराड, वडूज, अकलूज, विटा, सातारा, मेढा, सोलापूर, पंढरपूर, आटपाडी आदी आगारांनी जादा बसेस सोडल्या होत्या.म्हसवड पोलिस स्ठेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी 15 पोलीस अधिकारी, 150 पुरुष पोलीस व महिला पोलीस अंमलदार, 150 होमगार्ड, 02 जलद कृती दलाची पथके , 20 हुन अधिक पोलीस पाटील, 20 महाराष्ट्र कमांडो , स्वयंसेवक, सेवाभावी संस्थेचे सेवक, पोलीस मित्र यावेळी बंदोबस्तासाठी होते. रथ यात्रेनिमित्त मंदीरात श्रीचे दर्शनासाठी भाविकांच्या पहाटे पासुनच दर्शनबारीत भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. यात्रे निमित्त रिंगावण पेठ मैदानातील यात्रा भरली आहे यात्रेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी आज दिवसभर टिकुन होती.फिरते सिनेमागृह उंच व गोलाकार फिरणारे यांत्रिक पाळणे,मौतका कुँवा,नाना-नानी पार्क इत्यादी खेळांच्या साधनाकडे बालगोपाऴांची मोठी गर्दी होती. विविध मिठाई विक्रते, हळदी कुंकू खेळणी, बांगडी, लाखीचुढ्ढे, सौंदर्य प्रसाधनेची व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलुन गेली होती. भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने यात्रा नियोजनात पर्यायी वाहनतळ सुविधा करण्यात आली होती.गावोगावच्या मानाच्या काट्या व सासणे मुक्कामासाठी नदीपात्रालगत बाजार पटांगण येथे करण्यात आली होती. रथ यात्रे निमित्त मंदीरात श्रीचे दर्शनासाठी भाविकांच्या पहाटे पासुनच दर्शनबारीत भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. यात्रे निमित्त रिंगावण पेठ मैदानातील यात्रा भरली आहे यात्रेत खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी आज दिवसभर टिकुन होती.उंच व गोलाकार फिरणारे यांत्रिक पाळणे,मौतका कुँवा,नाना-नानी पार्क इत्यादी खेळांच्या साधनाकडे बालगोपाऴांची मोठी गर्दी होती. विविध मिठाई विक्रते, खेळणी,व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलुन गेली होती.
भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने यंदा यात्रा नियोजनात खुपच बदल करण्यात आल्याने ठिककाणी पर्यायी वाहनतळ सुविधा करण्यात आली होती.गावोगावच्या मानाच्या काट्या व सासणे मुक्कामासाठी बाजार पटांगणात सुविधा करण्यात आली होती.विशेष बाब म्हणजे यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रथमच प्रशासन पातळीवर खुपच दक्षता घेण्यात आली होती.
लाखो भाविकांचे कुलदैवत म्हसवडच्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवास उपस्थित राहून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. रणजितसिंह देशमुख (भैय्या) यांनी मनोभावे दर्शन घेतले.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!